sports

आंधळी धरण व राणंद मध्यम प्रकल्पात 55 टक्क्यांवर पाणीसाठा शिल्लक

माण तालुका टँकरमुक्तीच्या मार्गावर; शेतकरी वर्ग समाधानी

माण तालुक्यात यावर्षी पावसाची कृपादृष्टी चांगली झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा समाधानकारक आहे. परिणामी सर्व गावे आणि वाड्या-वस्त्या टँकरमुक्त राहणार आहेत. यंदा कोरोना आणि मिनी लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. तसेच माण तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळी टिकून असल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे. उपलब्ध पाण्यावर उन्हाळी पिके हाती घेतली आहेत. दहिवडी व गोंदवलेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही इतका पाणीसाठा आ

दौलत नाईक 

दहिवडी : माण तालुक्यात यावर्षी पावसाची कृपादृष्टी चांगली झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा समाधानकारक आहे. परिणामी सर्व गावे आणि वाड्या-वस्त्या टँकरमुक्त राहणार आहेत. यंदा कोरोना आणि मिनी लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. तसेच माण तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळी टिकून असल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे. उपलब्ध पाण्यावर उन्हाळी पिके हाती घेतली आहेत. दहिवडी व गोंदवलेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही इतका पाणीसाठा आंधळी धरणात आहे. 

आंधळी धरणावरील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला पाण्याची कमतरता जाणवणार नाही इतका मुबलक पाणीसाठा आहे. आंधळी धरण 56, पिंगळी तलाव 67 व राणंद मध्यम प्रकल्पात 60 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. सरासरी सर्व प्रकल्पात 37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर माण तालुक्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत असतो. परिणामी, प्रशासनाला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू लागत होते. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर टँकर मागणी प्रस्तावांना प्रवास करावा लागत असे. मात्र, या वर्षी टँकर मागणीचा एकही प्रस्ताव माण पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडे आलेला नाही. 

आगामी काळातही पिण्याच्या तुटवडा भासणार नसल्याचे चित्र यावर्षी तालुक्यात आहे. माण तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या कामांचा मोठा फायदा माण तालुक्यात सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावांत श्रमदानाचे तुफान आलं होतं. दुष्काळी परिस्थितीच्या कालावधीत ग्रामस्थ अगदी आबालवृद्धांसह एकजुटीने कामाला लागले होते. गावागावांत श्रमपंढरी फुलली अन् मोठ्या प्रमाणात श्रमदानातून कामे झाली होती.

या कामांवर यावर्षी निसर्गाने कृपा छत्र धरले, सर्व जलश्रोत भरून गेले त्याचा परिणाम आज ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाहायला मिळत आहे. अनेक गावांमध्ये शिवारातील विहिरींची पाणी पातळी अवघ्या पाच फुटांवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळेच यंदाच्या वर्षी शिवार हिरवा नेसून थटून गेला होता. 

राणंद जाशी ढाकणी लोधवडे प्रकल्पाचा शेती सिंचनासाठी फायदा राणंद तलावातून राणंद, जाशी, पळशी, गोंदवले खुर्द, ढाकणी तलावातून ढाकणी, गटेवाडी, दिडवाघवाडी तर लोधवडे तलावातून फक्त लोधवडे गावासाठी शेती सिंचनासाठी पाण्याचे एक आवर्तन करण्यात आले आहे. मात्र, आंधळी धरणाच्या परिसरातील विहिरींना चांगले पाणी असल्याने धरणातील पाण्याला शेतकर्‍यांकडून आतापर्यंत मागणी आली नाही.