maantalukapaanisaatha

esahas.com

आंधळी धरण व राणंद मध्यम प्रकल्पात 55 टक्क्यांवर पाणीसाठा शिल्लक

माण तालुक्यात यावर्षी पावसाची कृपादृष्टी चांगली झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा समाधानकारक आहे. परिणामी सर्व गावे आणि वाड्या-वस्त्या टँकरमुक्त राहणार आहेत. यंदा कोरोना आणि मिनी लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. तसेच माण तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळी टिकून असल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे. उपलब्ध पाण्यावर उन्हाळी पिके हाती घेतली आहेत. दहिवडी व गोंदवलेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही इतका पाणीसाठा आ