माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात कांदा काढणी व काटणीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र, कोसळलेल्या दरामुळे शेतकर्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. सध्या प्रति क्विंटल आठशे ते नऊशे रुपये दर मिळत आहे. भांडवली खर्चही निघत नसल्याने कांद्याने बळीराजा चिंताक्रांत झाल्याचे दिसत आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सातारा यांच्या 27/3/2021च्या आदेशान्वये एका पेक्षा पाच लोकांनी एकत्र येऊन संसर्ग वाढीला मदत करण्याच्या कारणावरून काल शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान खोमन गुळाचा चहा या हॉटेलमध्ये पाच पेक्षा जास्त म्हणजे दहा ते बारा लोक एकत्र येऊन सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत व्यवसाय करणारे रणजित रामचंद्र कांबळे यांचे दुकान सील करून पालिका व पोलीस प्रशासनाने म्हसवडच्या व्यावसायिकांना जोर का झटका दिल्याची चर्चा म्हसवड परिसरात सुरू आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवालयात रविवारी म्हसवड येथील श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी भक्तांच्या वतीने 275 किलो वजनाच्या सुखामेवा व इतर वस्तूचा आरास करुन अभिषेक घालण्यात आला व सांयकाळी तो सुखामेवा भक्तांना सालकरी अविनाश गुरव यांनी प्रसाद म्हणून वाटप केला.
राज्यभरात कोरोना विषाणूची दुसरी लाट पसरत आहे. त्याचबरोबर राज्यात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. यातच प्रशासन कोरोना निर्मूलनासाठी, आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचे दिसून येत आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपलं काही देणं लागतो, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून माणदेशी फाउंडेशन, म्हसवड (ता. माण) संचलित माणदेशी तरंग वाहिनीच्या माध्यमातून आणि सामुदायिक रेडिओ संघटना तसेच युनिसेफ यांच्या सहकार्यातून कोरोना जनजागृती कार्यक्रम विविध माध्यमातून राबविण्यात येत आहे.
‘शेतकर्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन माण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम पाटील यांनी केले.
माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त माण तालुक्यातील अंजली रामभाऊ खाडे यांचा माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे यांच्या हस्ते विशेष सन्मान केला.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीच्या मूर्तीला व मंदिरातील इतर देवांसह मंदिरास म्हसवडनगरीच्या भक्तांनी पहिल्यांदाच 551 किलोच्या विविध फळांची आरास सालकरी अविनाश गुरव यांच्या कल्पनेतून करण्यात येऊन आरासानंतर शहरात ती सर्व फळे प्रसाद म्हणून वाटण्यात आली.
माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबवत माण तालुक्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान केला.
माण तालुक्यातील कुरणवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बापू आटपाडकर यांची भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस युवापदी निवड करण्यात आली आहे.
पक्षांची पाण्यासाठी चाललेली धडपड पाहून माण तालुक्यातील वडगाव येथील माजी सरपंच सुजित अवघडे यांच्या राधेकृष्णा आणि श्रेया या दोन्ही बहीण- भावंडांनी पक्ष्यांसाठी पाणी व धान्याची सोय केली आहे. टाकाऊपासून टिकाऊ बर्ड फिल्टर तयार केले आहेत. त्यांच्या या स्तुत्य कार्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक केलं जात आहे.