मुक्या जीवांच्या चारा-पाण्यासाठी सरसावली बहीण-भावंडं
वडगावच्या राधेकृष्णा व श्रेयानं बनवलं बर्ड फिल्टर : स्तुत्य कार्याचं होतंय कौतुक
पक्षांची पाण्यासाठी चाललेली धडपड पाहून माण तालुक्यातील वडगाव येथील माजी सरपंच सुजित अवघडे यांच्या राधेकृष्णा आणि श्रेया या दोन्ही बहीण- भावंडांनी पक्ष्यांसाठी पाणी व धान्याची सोय केली आहे. टाकाऊपासून टिकाऊ बर्ड फिल्टर तयार केले आहेत. त्यांच्या या स्तुत्य कार्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक केलं जात आहे.
आकाश दडस
बिदाल : पक्षांची पाण्यासाठी चाललेली धडपड पाहून माण तालुक्यातील वडगाव येथील माजी सरपंच सुजित अवघडे यांच्या राधेकृष्णा आणि श्रेया या दोन्ही बहीण- भावंडांनी पक्ष्यांसाठी पाणी व धान्याची सोय केली आहे. टाकाऊपासून टिकाऊ बर्ड फिल्टर तयार केले आहेत. त्यांच्या या स्तुत्य कार्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक केलं जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तेलाच्या मोकळ्या डब्यापासून पक्ष्यांसाठी पाणी आणि दाणे ठेवण्यासाठी या लहान बालकांनी बर्ड फिल्टर बनवला आहे. या बहीण-भावाची जोडी विशेष म्हणजे शेतामध्ये सेंद्रिय शेती सुद्धा करते. त्यामध्ये गांडूळखत असे विविध प्रयोग सुद्धा लहान चिमुकली करत आहेत. सुजित अवघडे यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वीपणे करून माण तालुक्यातील शेतकर्यांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी वडगावचे माजी सरपंच सुजित अवघडे बोलताना म्हणाले, माझा मुलगा म्हणजे राधेकृष्णा हा लहानपणी सातत्याने आजारी पडत होता. त्यावेळी अनेक हॉस्पिटलला उपचार घेतले; मात्र उपचार घेऊन सुद्धा आजारपण कमी होत नव्हते. त्यानंतर काही लोकांच्या मार्गदर्शनामुळे मी सेंद्रिय शेतीकडे वळलो आणि स्वतःच्या शेतामध्ये विविध सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू केले. सेंद्रिय शेतीमधून जे उत्पादन केलेले पालेभाज्या आम्ही आमच्या कुटुंबात खाऊ लागलो. त्यानंतर माझा मुलगा पुन्हा कधी आजारी सुद्धा पडला नाही.
आता उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांसाठी टाकाऊपासून टिकाऊ बर्ड फिल्टर तयार केलेले आहे. याच्या माध्यमातून आम्ही पक्षांना पाणी व चार्याची सोय करत आहे. या कामांमध्ये लहान मुले स्वतःहून सहभागी होत आहेत. अजून आम्ही वडगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांसाठी पाण्याची व चार्याची सोय करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’
...अन् त्या दोघांनी करून दाखवले
पक्षांसाठी घराबाहेर पाणी ठेवा, असे संदेश सोशल मीडियावर फिरू लागतात. पण संदेश पाठवणारे पक्ष्यांसाठी पाणी ठेवत नाही. ही शोकांतिका आहे. यामुळे पक्षी कमी होऊ लागले आहेत. मात्र, या दोन बहीण-भावांनी प्रत्यक्षात हे करून दाखवले आहे.