वडगाव (ज. स्वा) येथील शेतकरी राजकुमार तुकाराम घार्गे व नंदकुमार मारुती नागमल यांची वडगाव ते गोरेगाव रस्त्यालगत शेती आहे. काल रात्री 8:45 वाजता त्या लाईनवरती शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शेतामध्ये असलेला ऊस जळून खाक झाला.
पक्षांची पाण्यासाठी चाललेली धडपड पाहून माण तालुक्यातील वडगाव येथील माजी सरपंच सुजित अवघडे यांच्या राधेकृष्णा आणि श्रेया या दोन्ही बहीण- भावंडांनी पक्ष्यांसाठी पाणी व धान्याची सोय केली आहे. टाकाऊपासून टिकाऊ बर्ड फिल्टर तयार केले आहेत. त्यांच्या या स्तुत्य कार्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक केलं जात आहे.
विद्यार्थ्यांच्या घरात, अंगणात तसेच घराशेजारील परिसरात विविध प्रकारे केलेल्या शैक्षणिक वातावरण निर्मितीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे घर हेच शाळा झाल्याची परिस्थिती वडगाव (ता. माण) येथे झाली आहे. जिल्हा परिषद शाळा वडगावचे मुख्याध्यापक संजय खरात यांनी घेतलेल्या कष्टाचे हे फलित आहे. माण पंचायत समिती सभापती कविता जगदाळे यांनी उपक्रमाची पाहणी करून उपक्रमाचे कौतुक केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!