sports

अंजली खाडे यांचा महिला दिनी विशेष सन्मान


माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त माण तालुक्यातील अंजली रामभाऊ खाडे यांचा माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे यांच्या हस्ते विशेष सन्मान केला.

बिदाल : माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त माण तालुक्यातील अंजली रामभाऊ खाडे यांचा माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे यांच्या हस्ते विशेष सन्मान केला.

अंजली खाडे यांनी कोरोनाच्या काळामध्ये जिल्हास्तरीय टीचर मेंटर कार्यशाळेत भाग घेऊन केंद्रस्तरीय कार्यशाळेत शिक्षकांना उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल नुकतेच जिल्हा परिषद सातारा व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण यांच्याकडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कोरोना काळात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या नाटिकेस जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला होता व तंत्रस्नेही म्हणून काम केले होते. नुकताच त्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये बी.एड. साठी प्रवेश मिळाला आहे.

यावेळी शिक्षक संघाचे विभागीय नेते मोहनराव जाधव, शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन तथा माण प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष महेंद्र अवघडे, प्राथमिक शिक्षक संघ माण तालुका महिला अध्यक्षा वर्षा देवकर, उपाध्यक्षा अंजली कट्टे, उषा जाधव, रामभाऊ खाडे व दत्तात्रय कोळी उपस्थित होते.