sports

‘भाजपा’ ओबीसी सातारा जिल्हा सरचिटणीस युवापदी बापू आटपाडकर यांची निवड


माण तालुक्यातील कुरणवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बापू आटपाडकर यांची भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस युवापदी निवड करण्यात आली आहे. 

दहिवडी : माण तालुक्यातील कुरणवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बापू आटपाडकर यांची भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस युवापदी निवड करण्यात आली आहे. 

आतापर्यंत बापू आटपाडकर यांनी ग्रामीण भागामध्ये पक्ष वाढवण्यासाठी सातत्याने काम केलेले आहे, त्याची दखल घेऊन जिल्हा पातळीवर निवड केली आहे. त्यांच्या निवडीमुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवडीनंतर बापू आटपाडकर म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व समाजातील युवा तरुणांना काम करण्याची संधी दिली जाते. माण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आगामी काळात युवा तरुणांचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार आहे.’

बापू आटपाडकर यांची भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सातारा जिल्हा युवा सरचिटणीस पदी निवड झाल्यानंतर खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिह ना.निंबाळकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सुनील शिंदे, ओबीसी मोर्चाच्या महिला संपर्कप्रमुख वनिता लोंढे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.