लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवालयात रविवारी म्हसवड येथील श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी भक्तांच्या वतीने 275 किलो वजनाच्या सुखामेवा व इतर वस्तूचा आरास करुन अभिषेक घालण्यात आला व सांयकाळी तो सुखामेवा भक्तांना सालकरी अविनाश गुरव यांनी प्रसाद म्हणून वाटप केला.
म्हसवड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवालयात रविवारी म्हसवड येथील श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी भक्तांच्या वतीने 275 किलो वजनाच्या सुखामेवा व इतर वस्तूचा आरास करुन अभिषेक घालण्यात आला व सांयकाळी तो सुखामेवा भक्तांना सालकरी अविनाश गुरव यांनी प्रसाद म्हणून वाटप केला.
रविवार हा श्री सिद्धनाथ महाराज यांचा मुख्य वार असल्याने या दिवशी मंदिरात मोठ्या प्रमाणात बाहेर गावावरून भक्तगण दर्शनासाठी येत असतात. या दिवशी विशेष आरास मंदिराचे मुख्य सालकरी अविनाश गुरव यांनी केली असून, गत वर्षापासून ते मंदिराचे सालकरी म्हणून देवस्थान ट्रस्ट यांनी त्यांच्याकडे पदभार दिला असला तरी कोविडमुळे पडलेल्या लॉकडाऊनने मंदिरे बंद होती. त्यामुळे भाविक मंदिराकडे फिरकले नसल्याने मंदिरे ओस पडली होती. अनलॉकनंतर काही अटीवर मंदिरे उघडण्यात आल्यानंतर भाविकांना मंदिराकडे आकर्षित करण्यासाठी श्रींना वेगवेगळ्या पोशाखात, वेगळ्या रूपात, वेगवेगळ्या पूजा, अभिषेक बांधून भाविकांची गर्दी मंदिराकडे वाढवण्याचे महत्त्वपूर्ण काम सालकरी अविनाश गुरव यांनी केल्याने म्हसवड व परिसरातील नागरिक उत्साहाने वेगवेगळी पूजा बांधून आपले नवस फेडतात.
आत्तापर्यंत 172 पूजा बांधल्या तर विशेष पूजेमध्ये दोन लाखाच्या खव्याची पूजा, सत्तर ते ऐंशी हजारांची विविध फळांची पूजा तर कालच्या रविवारी काजू, बदाम, पिस्ता, खारीक, खोबरे, बेदाणे आदी सुखा मेव्याची मंदिराच्या इतिहासात प्रथमच ड्रायफूड (सुखा मेवा) यांची 275 किलोची पूजा बांधण्यात आली होती.
या ड्रायफुडच्या सहाय्याने संपूर्ण मंदिरात व श्रींच्या मूर्तीस सजवण्यात आल्याने सिद्धनाथ मंदिर व श्रींची मूर्ती मनमोहक दिसत होती. हे मनमोहक दृश्य आपल्या नजरेत साठवून ठेवण्याबरोबर मोबाईल, कॅमेर्यात फोटो काढताना भाविक दिसत होते.