शेतकर्यांच्या जिद्दीनेच आंब्याची निर्यात वाढली
शैलेश सूर्यवंशी : देवापूर येथील आंबा बागेची केली पाहणी
‘दुष्काळी माण तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकर्यांनी यंदा मोठ्या कष्टाने व जिद्दीने यश मिळविल्यामुळेच येथील आंब्यास परदेशात मागणी वाढू लागली व निर्यातही होऊ लागला,’ असे मत माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
वरकुटे : ‘दुष्काळी माण तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकर्यांनी यंदा मोठ्या कष्टाने व जिद्दीने यश मिळविल्यामुळेच येथील आंब्यास परदेशात मागणी वाढू लागली व निर्यातही होऊ लागला,’ असे मत माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
देवापूर (ता. माण) येथील उद्धव बाबर यांनी संपूर्ण सेंद्रीय खताची मात्रा देत जोपासलेल्या आंबा बागेची पाहणी केल्यानंतर उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
बाबर यांनी लागवड केलेल्या केसर जातीची आंबा बाग यंदा फळांनी बहरली असून, पक्षी कीटक, ऊन, वारा, पाऊस व संभाव्य गारपिटीने आंबा फळास कोणतीही इजा होऊ नये, ते सुरक्षित राहावे व देश विदेशातील बाजारपेठेत विक्रीसाठी सर्व निकषासह गुणवत्तापूर्वक ठरावे यासाठी त्यांनी प्रत्येक झाडाच्या आंबा फळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कागदी पिशव्यांची आवरणे यांची पाहणी सूर्यवंशी यांनी केली.
तसेच बाबर यांनी पूर्णत: सेंद्रीय पद्धतीने लागवड करून जोपासलेल्या उसाच्या पिकाची व त्यापासून बनविलेल्या सेंद्रीय गूळ व काकवीची माहिती घेऊन त्यांनी शेतातच विविध प्रकारच्या सेंद्रीय खते निर्मितीच्या छोट्या प्रकल्पाचीही पाहणी केली.