maharashtra

दहिवडी येथे स्विफ्ट- ट्रकचा भीषण अपघात

2 युवक जागीच ठार; एकजण गंभीर जखमी

Swift-truck accident at Dahiwadi
सातारा जिल्ह्यातील दहिवडी- फलटण या मार्गावर स्विफ्ट आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत 2 युवक जागीच ठार झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. दहिवडी येथून दीड ते दोन किलोमीटर अतंरावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर हा भीषण अपघात झाला. ट्रकचा चालक हा घटनास्थळावरून पळून गेला आहे.

दहिवडी : सातारा जिल्ह्यातील दहिवडी- फलटण या मार्गावर स्विफ्ट आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत 2 युवक जागीच ठार झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. दहिवडी येथून दीड ते दोन किलोमीटर अतंरावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर हा भीषण अपघात झाला. ट्रकचा चालक हा घटनास्थळावरून पळून गेला आहे.
अपघातात दहिवडीतील पियुष शैलेंद्र खरात (वय - 22), स्वयंम सुशिल खरात (वय- 16) यांचा जागीच मृत्यू झाला तर अक्षय दीपक खरात हा जखमी झाला आहे. जखमीस सातारा येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद शैलेंद्र पंढरीनाथ खरात यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दहिवडी येथे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दहिवडीजवळ झालेल्या स्विफ्ट कार (क्र. एमएच-42-एएक्स-0345) आणि माल वाहतूक ट्रकच्या (क्र. एमपी-09- एचएच- 9871) भीषण अपघात होवून ट्रक पलटी झाला. तर स्विफ्ट कार रस्त्यांच्या बाजूला गेली होती. त्यामध्ये स्वयंम सुशील खरात हा चालकाच्या सीटवर होता. तर त्याच्या पाठिमागील बाजूस पियुष शेलेंद्र खरात होता. यांचा जागीच मृत्यू झाला होता तर अक्षय दीपक खरात चालकाच्या सीटच्या शेजारी किरकोळ जखमी झालेला होता.