वाई शहरातील लोकमान्य टिळक ग्रंथालयाच्या समोर लावलेली दुचाकी दि. 2 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता दुचाकी चोरटय़ाने चोरुन नेली. हा दुचाकी चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आला. परंतु तब्बल 12 दिवस तो चोरटा पोलिसांना सापडला नाही. अखेर दुचाकी मालकाने अज्ञात चोरटय़ाविरुद्ध वाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : वाई शहरातील लोकमान्य टिळक ग्रंथालयाच्या समोर लावलेली दुचाकी दि. 2 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता दुचाकी चोरटय़ाने चोरुन नेली. हा दुचाकी चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आला. परंतु तब्बल 12 दिवस तो चोरटा पोलिसांना सापडला नाही. अखेर दुचाकी मालकाने अज्ञात चोरटय़ाविरुद्ध वाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास महिला पोलीस हवालदार कदम या करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की शेलारवाडीचे ज्ञानेश्वर मांढरे हे वाई शहरात दि. 2 रोजी दुपारी 4 वाजता आपल्या दुचाकीवरुन आले होते. दुचाकी गणपती आळी लोकमान्य टिळक ग्रंथालयासमोर लावली आणि ते हॉटेलमध्ये मित्रासमवेत चहा पिण्यासाठी गेले. चहा पिवून बाहेर आले तर त्यांची दुचाकी लावलेल्या ठिकाणी नव्हती. त्यांनी शोधाशोध केली परंतु दुचाकी कुठेही दिसली नाही. त्यावरुन त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता त्यांची दुचाकी एक युवक ढकलत नेत असल्याचे दिसले. त्यावरुन त्यांनी विचारपूस केली असता त्या तरुणाने दुचाकी एका गॅरेजपर्यंत ढकलत नेली. त्या गॅरेजवाल्याकडे जावून विचारले असता तो त्या गॅरेजवाल्याला म्हणत होता की, दुचाकीची चावी हरवली आहे. चावीवाल्याकडे नेईपर्यंत चालु करुन द्या, अशी विनंती केल्यावरुन गॅरेजमधील मिस्त्रीने दुचाकी सुरु करुन दिली. त्यावर तो युवक बसला आणि थेट गंगापूरी वेशीच्या दिशेने दुचाकीवरुन गेल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. त्या तरुणाचा आणि दुचाकीचा शोध ज्ञानेश्वर मांढरे हे दि. 13 रोजीपर्यंत घेत होते. त्यांना दुचाकी आढळून आली नाही. अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


