maharashtra

वाई, महाबळेश्‍वरातून चोरीला गेलेल्या सहा दुचाक्या हस्तगत

वाई पोलिसांची मोठी कारवाई; दोघे गजाआड

येथील वाई पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने महाबळेश्वरातून चोरीला गेलेल्या पाच हिरो होंडा स्प्लेंडर व एक बुलेट अशा सहा दुचाक्या जप्त केल्या असून दोघांना अटक केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या या कारवाईचे जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी कौतुक केले आहे.

वाई : येथील वाई पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने महाबळेश्वरातून चोरीला गेलेल्या पाच हिरो होंडा स्प्लेंडर व एक बुलेट अशा सहा दुचाक्या जप्त केल्या असून दोघांना अटक केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या या कारवाईचे जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी कौतुक केले आहे.
प्रतीक लक्ष्मण भोसले (वय 19, रा. शिरगाव, ता. वाई) व हेमंत किशोर कदम (वय  19, रा. खेड नांदगिरी,  ता. कोरेगाव ) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाबळेश्वर शहरातून 5 हिरो हॉन्डा स्प्लेंडर व 1 बलेट अशा 6 दुचाकी चोरीस गेल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख  अजयकुमार बन्सल यांनी  सर्व पोलीस ठाण्यांना चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार वाई पोलीस ठाण्याची गुन्हे प्रकटीकरण शाखा ही अनेक दिवसापासून तपास करीत होती. तपासा दरम्यान बाळासाहेब भरणे यांना गुरुवारी (दि. 28) खबर्‍याकडून माहिती मिळाली की, दोन मुले काळ्या रंगाच्या नंबर नसलेल्या मोपेड गाडीवरून संशयीतरित्या वाई शहरात फिरत आहेत. मोटार सायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेवून भरणे यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचार्‍यांना या संशयीतांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी हे  शोध घेत असताना एका पाठीमोगील बाजूस नंबरप्लेट नसलेल्या मोपेड गाडीवरून दोन्ही संशयीत सिध्दनाथवाडी, वाई येथे फिरत असताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गेल्या 1 महिन्याच्या कालावधीत महाबळेश्वर येथून 1 बुलेट व 1 हिरो हॉन्डा स्प्लेन्डर मोटार सायकल तसेच वाई शहरातून 4 हिरो हॉन्डा स्प्लैन्डर मोटार सायकल अशा सुमारे 3 लाख रुपये किंमतीच्या 6 मोटार सायकल चोरलेल्या असल्याची कबुली दिली आहे.  चोरलेल्या दुचाकींपैकी काही दुचाक्या या आई, आज्जी अजारी असल्याने पैशाची गरज आहे, असे कारण सांगून विकलेल्या असल्याचे सांगितल्यानंतर संबंधित सर्व दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, पोलीस नाईक उमेश गहीण, महीला पोलीस नाईक सोनाली माने, पो.कॉ. अमित गोळे, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुस्कर, श्रयण राठोड, हेमंत शिंदे, अक्षय नेवसे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.