‘आज जगात भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली बलाढ्य देश म्हणून पुढे येत आहे. नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली रोजगार, शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय, उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रात देशाने घेतलेली भरारी आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी व विशेषतः युवा पिढीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांनी केले.
येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरु असणार्या रुग्णाने आजाराला कंटाळून व नैराश्यातून रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करत पळून जाऊन कृष्णा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केली. संचित कोविडं रुग्णालयानजीक आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
कोरोनासारख्या भयंकर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. या भीषण परिस्थितीत आशाताईंनी आपला जीव धोक्यात घालून शासनाने दिलेल्या कामाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत कोविड विरुद्धच्या लढाईत आघाडीवर आहेत. या संकटाशी सामना करताना त्यांच्या या लढाईला बळ देण्यासाठी ‘भाजपाचा जिल्हा महिला मोर्चा’च्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांच्या माध्यमातून राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व
करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यावर भर द्यावा असे आवाहन वाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले.