करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी भीम नगर तिकटण्यात ताब्यात घेतले. हे सर्व जण पैशाच्या वसुली साठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
‘सध्या सर्वत्र सुरू असलेल्या कोरोना वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपाययोजनांना मदत करण्यासाठी वाई अर्बन बँक परिवाराच्या वतीने 100 बेड कोरोना केअर सेंटरकरिता वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजितसिंह भोसले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहेत,’ अशी माहिती दि वाई अर्बन को. आँप. बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी दिली.
‘किसन वीर साखर कारखाना यंदा आपला 50वा गळीत हंगाम साजरा करीत आहे. कारखान्याची सूत्रे शेतकरी सभासदांच्या विश्वासावर हाती घेतल्यानंतर सभासद, कर्मचारी आणि कारखान्यासाठी उपयुक्त घटकांनी घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेमुळे कार्यस्थळावर अनेक नवनवीन प्रकल्प उभे करता आले. याचा विशेष आनंद मला व माझ्या व्यवस्थापनास आहे, परंतु गेल्या काही वर्षात साखर उद्योग अनेक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. नैसर्गिक आणि आर्थिक संकटामुळे आपल्या उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम झाला. या कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी सभासद व कामगारांन
महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज येथे पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस कोल्हापूर विभाग शिंत्रे यांच्या हस्ते ज्या हायवे वॉरियर्स मृत्युंजय दूत यांनी अपघातामध्ये जखमींना तत्काळ मदत करून हॉस्पिटलमध्ये दाखल केले, अशा मृत्युंजय दूतांचा फुलाचे झाड व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
येथील दि वाई अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी यांना सहकार क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल नुकतेच नवी दिल्ली येथील प्रमोटिंग अॅचिव्हमेंट फाउंडेशनचा भारत निर्माण पुरस्कार मिळाला आहे. स्टर्लिंग मेरीट एक्सलंट परफॉरमन्स अॅड आऊटस्टॅडिंग कॉन्ट्रीब्युशन इन द फिल्ड ऑप को. ऑपरेटिव्ह बँक डेव्हलपमेंट या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, माजी अध्यक्ष व वाई अर्बन परिवाराचे प्रमुख अरूण देव यांच्या हस्ते चावलानी यांचा सत्कार
‘बँकिंग ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखून दि वाई अर्बन को. आँप. बँकेने शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आकर्षक (डायनॅमिक) वेबसाईट बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. विनय जोगळेकर यांच्या हस्ते सुरू केली आहे. बँकेचे सभासद, खातेदार, कर्जदार व हितचिंतक यांनी नव्या आकर्षक स्वरूपातील वेबसाईटला अवश्य भेट द्यावी,’ असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक आणि टोपलीभर ताज्या रसरशीत भाज्या, फळझाडांचे रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत, वयाच्या 82व्या वर्षी देखील ताठ कण्याने दररोज रानात मजुरीने राबणार्या झिंगराअक्का कुंभार या कष्टकरी वृद्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावर मानाचं स्थान आणि साडीचोळी देऊन सन्मान, अशा अनोख्या आणि शेतकरी, कष्टकर्यांच्या शेतमालाचा, श्रमाचा गौरव करणार्या कृतीने भुईंज येथील साक्षी इरिगेटर्सचे नव्या वास्तूत दिमाखात स्थलांतर झाले.
वाई येथील ब्राह्म समाजाच्या इमारतीत असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची मुलींची शाळा पाडल्याप्रकरणी वाई न्यायालयाने वाई पोलिसांना ब्राह्म समाजाच्या अध्यक्षा मीनल राजेंद्र साबळे त्यांचे पती राजेंद्र सर्जेराव साबळे व अन्य सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
‘बचतगट चळवळीने महिलांना दिलेली शक्ती महत्त्वाची आहे. या शक्तीतून एकत्र आलेल्या भीमजननी बचतगटास भक्कम पाठबळ देऊ. महिलांनी निर्भयपणे आणि एकजुटीने काम करावे. काही अडचण आल्यास पोलीस दल महिलांच्या पाठीशी आहे,’ अशी ग्वाही पोलीस उपअधीक्षक शीतल जानवे-खराडे यांनी दिली.
सहकार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल येथील दि वाई अर्बन को ऑप. बँकेचे अध्यक्ष सीए चंद्रकांत काळे यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते लेक्सिकॉन भारत लीडरशीप अॅवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.