आनेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
शस्त्रबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी चार जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. उशिरा पर्यंत खंडाळा, शिरवळ, बावडा व भादे गटाची मतमोजणी सुरु असून या चारही गटात राष्ट्रवादीने आघाडी मारली आहे.
येथील महागणपती घाटावर परप्रांतीय तरुणावर दोन्ही हातात तलवारी घेऊन ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी व शहरातील सहा मद्य विक्रीच्या दुकानात तोडफोड करून दहशतीने दुकाने बंद केल्याप्रकरणी अजय गोपी घाडगे यास पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
देशभक्त क्रांतिवीर किसन वीर यांचे सुपुत्र सातारा जिल्ह्याचे जेष्ठ नेते, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश (आण्णा) किसन वीर (वय ८२) यांचे आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सातारा येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पाचवड, ता. वाई येथील विराट नगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या तिघांच्या विरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाई तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर ३२ वर्षीय तरुणाने महाबळेश्वर आणि वाई तालुक्याच्या परिसरात वेळोवेळी बलात्कार केल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी संशयित आरोपी राजेंद्र महादेव रांजणे (वय ३२) याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले आहे.
वाई, दि. २८: भारतामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यावर महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना करीत आहे. आपल्या सातारा जिल्हयातही कोरोनाचा कहर सुरू आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी सातारा जिल्हयात कडक लॉकडाउन केलेले आहे. या कोरानाचा पार्श्वभुमीवर आज वाई नगरपरिषदेची विशेष सभा व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे पार पडली. पहिल्यांदाच या कठीण परिस्थितीमध्ये दोन्ही आघाड्यांनी गट-तट न पाह...
लाखानगर वाई येथे दारु विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी छापा टाकून युवकास ताब्यात घेतले. त्या युवकाकडून सुमारे इंडिका कारसह एक लाख बारा हजार 840 रुपयांचा ऐवज हस्तगत केला असून त्या युवकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणीच्या उद्देशाने आलेल्या गज्या मारणे टोळीशी संबंधित तेरा जणांची न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. गुरुवारी वाई पोलिसांनी पुणे महाबळेश्वर रस्त्यावर भीमनगर वाई तपासणी नाक्यावर सर्वांना ताब्यात घेतले होते.