मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने घेतलेली भरारी सर्वांसाठी अभिमानास्पद
डॉ. सुरभी भोसले-चव्हाण : भाजपा जिल्हा महिला मोर्चाच्यावतीने वाईमध्ये वृक्षारोपण
‘आज जगात भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली बलाढ्य देश म्हणून पुढे येत आहे. नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली रोजगार, शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय, उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रात देशाने घेतलेली भरारी आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी व विशेषतः युवा पिढीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांनी केले.
भुईंज : ‘आज जगात भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली बलाढ्य देश म्हणून पुढे येत आहे. नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली रोजगार, शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय, उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रात देशाने घेतलेली भरारी आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी व विशेषतः युवा पिढीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांनी केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजपा जिल्हा मोर्चाच्यावतीने वाई येथील जेजुरीकर कॉलनी येथे जिल्हा मोर्चा अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पेरू व आवळा या जातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
या वेळी वाई शहर भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा शुभदा नागपूरकर, उपाध्यक्षा विनया सुरतराम, सरचिटणीस सुषमा शिंदे, कविता झेबले, हेमा कुंभार, जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.