ऑनलाइन ट्रान्झेक्शनमध्ये वाढ झाली असताना दुसरीकडे ऑनलाइन फ्रॉडच्या (Online Fraud) प्रकरणातही मोठी वाढ झाली आहे. जवळपास सर्वच ठिकाणी सायबर क्रिमिनल्स (Cyber Criminals) सक्रिय झाले आहेत. नुकतंच पोलिसांनी अशा सायबर क्रिमिनलला ताब्यात घेतलं आहे जे पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या खात्यातून पैसे चोरी करत होते. एटीएम कार्डद्वारे पेट्रोलचे पैसे भरणाऱ्या लोकांचं कार्ड क्लोन (ATM card) करुन त्यांच्या खात्यातून ऑनलाइन फ्रॉडद्वारे चोरी केली जात होती.