techgadget

कारमध्ये AC सुरू ठेवल्यास एका तासात किती इंधन खर्च होते? तुम्हाला काय वाटतं?

एसीचा मायलेजवर किती परिणाम होतो आणि पार्क केलेल्या वाहनात एसी चालवल्यास किती पेट्रोल खर्च होतो?

How much fuel does an car cost in an hour if AC is turned on? What do you think
जेव्हाही तुम्ही एसी चालू ठेवून गाडी चालवता तेव्हा त्याचा कारच्या मायलेजवर परिणाम होतो. पण, अनेकांना असा देखील प्रश्न पडतो की, जर आम्ही गाडी चालवली नाही आणि एसी चालू ठेवला तर त्यानुसार गाडीला इंधन खर्च होतो का? होतो तर मग तो किती खर्च होतो? अशा स्थितीत, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की एसीचा मायलेजवर किती परिणाम होतो आणि पार्क केलेल्या वाहनात एसी चालवल्यास किती पेट्रोल खर्च होतो? गाडीचा एसी कसा काम करतो?

मुंबई :

आपण बऱ्याचदा कारने फिरताना कारचा एसी सुरू करतो. असे फार क्वचित लोकं असतील की, जे लोक कारमधील एसी वापरत नसतील. आपल्याला हे ही माहित आहे की, कारमधील एसी हा कारमधील इंधनावरतीच चालतो. म्हणजे तो पेट्रोल किंवा डिझेल वरती चालतो. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की कारमध्ये एसी सुरू करण्यासाठी किती इंधन वापरले जाते?
जेव्हाही तुम्ही एसी चालू ठेवून गाडी चालवता तेव्हा त्याचा कारच्या मायलेजवर परिणाम होतो. पण, अनेकांना असा देखील प्रश्न पडतो की, जर आम्ही गाडी चालवली नाही आणि एसी चालू ठेवला तर त्यानुसार गाडीला इंधन खर्च होतो का? होतो तर मग तो किती खर्च होतो?
अशा स्थितीत, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की एसीचा मायलेजवर किती परिणाम होतो आणि पार्क केलेल्या वाहनात एसी चालवल्यास किती पेट्रोल खर्च होतो?
गाडीचा एसी कसा काम करतो?
जर कारच्या एसीबद्दल बोलायचे झाले, तर कारचा एसी चालू असताना तो अल्टरनेटरमधून मिळालेली ऊर्जा वापरतो आणि ही ऊर्जा इंजिनद्वारे प्राप्त होते. इंजिन इंधन टाकीतून इंधन वापरते, परंतु कार सुरू होईपर्यंत एसी चालूही होत नाही, कारण एसी कॉम्प्रेसरला जोडलेला बेल्ट हा कारचे इंजिन सुरू झाल्यावरच फिरतो. मग तो सामान्य एसीसारखे काम करतो.
एसीमुळे कारच्या मायलेजमध्ये नक्कीच 5 ते 7 टक्के फरक पडतो. परंतु काही रिपोर्टचे म्हणणे वेगळे आहे. जेव्हा तुम्ही कारमध्ये एसी चालवता तेव्हा त्याचा कारवर अनेक प्रकारे परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही हायवेवर जास्त वेगाने कार चालवली आणि खिडक्या उघड्या ठेवून चालवल्या तर त्याचा वाहनाच्या वेगावर परिणाम होतो. ज्याचा इंधनावर देखील परिणाम होतो. त्यामुळे हायवेवर एसी लावून गाडी चालवत असाल तर मायलेजवर त्याचा तसा काही फारसा परिणाम होत नाही.
त्याच वेळी, जर तुम्ही एसी सुरू करुन कार सामान्य स्थितीत चालवली किंवा सामान्य स्पीडने चालवली तर त्याचा मायलेजवर 5 ते 7 टक्के परिणाम होतो.
एका जागी उभ्या असलेल्या कारमध्ये एसी चालवल्यास काय होईल?
एका रिपोर्ट्सनुसार, एका कारचे 1000 सीसी इंजिन आहे आणि ते चालू ठेवले तर एका तासात सुमारे 0.6 लिटर पेट्रोल खर्च होते. त्याच बरोबर एसी चालवून कार चालू ठेवली तर इंधन जवळपास दुप्पट खर्च होतो.
या स्थितीत एका तासाचा पेट्रोलचा वापर 1.2 लिटरपर्यंत होऊ शकतो. बरं हे कारच्या इंजिनवर अवलंबून आहे की, कारमध्ये एसी चालवल्याचा काय परिणाम होतो. जर आपण सामान्य हॅचबॅक कारबद्दल बोललो तर ही किंमत 1 लिटर ते 1.2 लीटर असू शकते. पण लक्षात ठेवा की वाहनाची स्थिती, इंजिन, एसीची स्थिती ही देखील यामध्ये महत्त्वाची कारणे आहेत