तामिळनाडू मधील कृष्णगिरी जिल्ह्यतील तल्ली येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम रविवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी प्रतिमेची मिरवणूक करून साजरी करण्यात येणार आहे.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे. यावर मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली.
Chhatrapati Shivaji Maharaj: भारतीय लष्कराने चीनच्या सीमेलगत छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला आहे. लडाखमधील पँगाँग तलावाच्या काठावर 14,300 फूट उंचीवर पुतळा बसवण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे देशासाठी असलेले अमूल्य योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी मानसपुत्राने केंद्र सरकारकडे शिफारस का केली नाही, असा सवाल महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.
फलटण प्रतिनिधी:- शहर आणि परिसरात घराघरांमध्ये शिवजयंती उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात पारंपरिक वाद्यात आणि भव्यदिव्य देखाव्यासहित मिरवणुका काढून साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी संग्रहालय अद्ययावत सुविधांसह थ्रीडी स्वरूपात तातडीने खुले करावे अन्यथा या विलंबाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना दिसेल तिथे काळे फासले जाईल, असा खळबळजनक इशारा सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेश शिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत जे वादग्रस्त विधान केले, त्याचा आम आदमी पार्टीच्यावतीने सातारा शहरातील शिवतीर्थावर निषेध नोंदविण्यात आला. तसेच कोश्यारी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद राज्यभरात पाहायला मिळाले. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट याविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अधिसभा सिनेट निवडणुकीत कराडचे अमित जाधव विजयी सातारा : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची सन 2022 ते 2027 कालावधीसाठी झालेल्या अधिसभा सिनेट निवडणुकीत कराडचे अमित जाधव हे नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून पहिल्या पसंतीची 1701 मते घेऊन मोठ्या फरकाने निवडून आले. या निवडणुकीसाठी दि. 14 नोव्हेंबर रोजी मतदानप्रक्रिया पार पडली होती. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 33 मतदान केंद्रावर मतदान झाले. त्यांनतर दि.16 नोव्हेंबरं रोजी मतमोजणीप्रक्रिया घेण्यात आली. सदर निवडणूक ही पसंतिक्रम नोंदवून घेण्यात आले होते त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया सुमारे 36 तासाहून जास्त वेळ चालली. नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघात सुमारे 11131 पदवीधरांनी मतदान केले होते. या मतदारसंघातून 10 उमेदवार निवडून द्यायचे होते. त्यापैकी 9 उमेदवार हे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष मा.डॉ. संजय डी पाटील यांचे अध्यक्षतेखालील विद्यापीठ विकास आघाडीचे निवडून आले. तर विरोधी आघाडीचा फक्त 1 उमेदवार निवडून आला. आजपर्यंत सिनेट अधिसभा निवडणुकीत नेहमीच कोल्हापूर जिल्ह्याचे वर्चस्व दिसून आले आहे परंतु या निवडणुकीत पहिल्यांदाच पदवीधर मतदारसंघातून सातारा आणि सांगली जिल्ह्यातून एकमेव तासवडे, ता.कराड गावचे सुपुत्र अमित जाधव यांना शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. इतर सर्व निवडून आलेले 9 उमेदवार हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. सातारा, सांगली आणी कोल्हापूर असे तीन जिल्ह्यांचे कार्यक्षत्र असल्याने सदर निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. या तिन्ही जिल्ह्यातील विविध महाविद्यालये या अंतर्गत येतात. विद्यार्थी, पदवीधर, प्राध्यापक, कर्मचारी आणी संस्थांचालक यांना भेडसवणारे प्रश्न, शैक्षणिक धोरण, विद्यापीठ अर्थसंकल्प , परीक्षा आदी महत्वपूर्ण बाबींवर अधिसभा सिनेट मध्ये निर्णय घेण्यात येतात. अमित जाधव हे गेल्या बारा वर्षांपासून कॉंग्रेसच्या विद्यार्थी ( छडणख ) व युवक संघटनेत काम करीत आहेत. सध्या ते सातारा जिल्हा युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. विद्यापीठांतर्गत येणार्या सर्व घटकांचा आवाज बनून मी नक्की अधिसभेत हक्काने प्रश्न उपस्थित करून त्यावर न्याय मिळवून देईन अशी प्रतिक्रिया अमित जाधव यांनी विजयी झालेवर दिली. तसेंच मला सदर ठिकाणी काम करणेची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.आ.पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री मा.आ.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब , विद्यापीठ विकास आघाडीचे अध्यक्ष मा.डॉ.संजय डी पाटील साहेब , मा.आ.ऋतुराज पाटील, मा.आ.जयंत आसगावकर यांचे आभार मानले. या विजयाबद्दल त्यांचे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रकाश बापू पाटील, डॉ.डी.आर मोरे सर, भैया माने, धैर्यशील बाबा पाटील, अमित कुलकर्णी, देवराज दादा पाटील, उदयसिंह पाटील, चित्रलेखा ताई कदम, अमरसिंह पाटणकर, निवास थोरात, सचिन बेडके - सूर्यवंशी, संजीव चव्हाण, पृथ्वीराज गोडसे, डॉ.सूर्यकांत केंगार, प्राचार्य एल. जी.जाधव , प्राचार्य मोहन राजमाने आदीनीं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या जागेत ई-बस साठी चार्जिंग स्टेशन उभारण्यास शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज जोरदार विरोध करत तीव्र निदर्शने केली. एसटी महामंडळ व जिल्हा प्रशासनाचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला. हे चार्जिंग स्टेशन महामंडळाच्या जागीच करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
राजघराण्याचे बारावे वंशज व शाहूनगरीचे माजी नगराध्यक्ष व राजघराण्याचा भक्कम आधारवड, कुशल मार्गदर्शक व मनोमिलनाचे शिल्पकार श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (वय ७५) यांच्या निधनाने अवघा सातारा सुन्न झाला आहे. शोकाकुल वातावरणामध्ये संगम माहुली येथील राजघाटावर शिवाजीराजे भोसले यांच्यावर बुधवारी दुपारी पावणेचार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
साताऱ्याच्या राजघराण्यातील शांत आणि संयमी व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचं पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झालं. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे ते काका होते. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सातारा शहराचं नगराध्यक्षपद देखील भूषवलं होतं.
येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या एका उघड्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने ३ लाख ३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयात प्राणायाम, योगासनांच्या प्रात्यक्षिकासह आरोग्यपूर्ण प्रशिक्षणाने आज जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
प्राचीन काळापासून होळीचा सण हा लोकोत्सव म्हणून संपूर्ण भारतात साजरा होत असल्यामुळे त्या-त्या प्रांतात होळीला निरनिराळ्या नावाने ओळखतात. ही प्रथा शिवकाळापासून आहे, असे म्हटले जाते. असा हा प्राचीन काळापासून लोकोत्सव म्हणून मान्य पावलेला होळीचा सण शिवकाळात कसा साजरा होत होता. पाहूया सविस्तर..
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राजधानी साताऱ्यातील माहोल शिवमय झाला. शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गावांमध्ये शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांचा निनाद सुरू होता. सज्जनगड, प्रतापगड, वसंतगड, अजिंक्यतारा, रोहिरेश्वर या किल्ल्यांवरून शिवज्योत नेण्याची लगबग सुरू होती. शाहूनगरीने शिवजयंतीच्या निमित्ताने साक्षात शिवकाल अनुभवला.
केंजळ (ता.वाई) येथे १२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री भैरवनाथ मंदिरासमोर शासनाच्या कुठल्याही खात्याची परवानगी न घेताच अनाधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजीनगर, ता. सातारा गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सातारा येथील राजवाडा बसस्थानक परिसरात लावण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी यांच्या वादग्रस्त शिल्पाचे आज येथील हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक लोकार्पण करून त्यांच्या शिल्पावर दुग्धाभिषेक केला. शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणी भाजपाचे नगरसेवक विजय काटवटे हिंदुत्ववादी संघटनेचे मिलिंद एकबोटे यांच्यासह बारा जणांना ताब्यात घेतले आहे.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची कर्नाटक राज्याची राजधानी असणाऱ्या बेंगलूरूमध्ये अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रासह मराठा साम्राज्याची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या साताऱ्यात पडसाद उमटले.
फलटणमधील अवैध गौण खनिज वाहतूक करीत असताना कारवाई करण्यात आलेल्या वाळूमाफियाने प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. या विरोधात महसूल कर्मचार्यांंनी आज दि. 17 रोजी एकदिवसीय लेखणीबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
श्री. छ. शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु असताना दिसून येत आहे. त्याचे मागून राजधानी सातारा चा सेल्फी पॉईंचे पण काम सुरु होऊन पूर्ण होऊन त्याचे मोठ्या दिमाखात उदघाटन पण झाले. एवडी सगळी कामे जलद गतीने होत असताना अशा कोणत्या अडचणी आहेत कि त्या श्री. छ. शिवाजी महाराज पुतळा परिसराचे काम धीमे करत आहेत
मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहलायाची नवीन वास्तू सुसज्ज अशी आहे. त्याच इमारतीत हे संग्रहालय सुरु व्हावे. अशी मनोमन इच्छा आम्हा शिवभक्तांची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नव्या इमारतीचे हस्तांतरण करावे, जेणेकरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संग्रहालयाला चांगले दिवस येतील.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येते व पुरातत्व विभाग आपली मालमत्ता कधीही कोणालाही हस्तांतरीत करीत नाही. असे असताना सातारा जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेऊन संग्रहालयाचे रूपांतर जम्बो कोविड सेंटर मध्ये केले व नंतर मेडिकल कॉलेजमध्ये केले.
छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असून विविध दालनांच्या अद्ययावतीकरणाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. या कामाचा तब्बल सव्वातीन कोटी रूपयांचा निधी प्रलंबित आहे. सातारा एसटी आगारासमोरील छत्रपती शिवाजी संग्रहालयाची जुनी इमारत मोडकळीस आली असून येथे पुरातत्व विभागाच्या ऐतिहासिक वस्तूंचे मोठे दालनं आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना उपकेंद्रासाठी खावली येथील जागा उपलब्ध होणेबाबत संबंधीत विभागाच्या प्रशासकीय विभागांची येत्या आठवडयात बैठक घेवून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी आम जनतेच्या वतीने विशेष विनंती केली.
‘सैनिकी शिक्षणात भारतीय स्वातंत्र्य चळवळ व संविधानाची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे. लोकशाहीचे रक्षण आणि हुकूमशाहीला विरोध ही जाणीव विद्यार्थी दशेपासून रुजवली पाहिजे. भारतीय संविधानातील हक्क आणि कर्तव्ये राष्ट्र छात्र दलास माहिती पाहिजेतच.कवायतीने शारीरिक सामर्थ्य मिळेल; पण विद्यार्थ्याला राष्ट्रातील वर्तमान घडामोडी माहीत असल्याच पाहिजेत. पारंपरिक सामाजिक विषमता आपण नाकारली असून, संविधानिक समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय मूल्यांवरच देश पुढे नेणे आवश्यक आहे. जगाला बुद्ध हवा असू
‘कर्मवीरांनी आम्हाला कष्टांचा संस्कार दिला. त्यामुळे आम्हाला कधीही शेण काढण्याची लाज वाटली नाही. आम्ही विहिरी खोदल्या, भाज्या विकल्या, खडी फोडली त्यामुळे आमचे जीवन चांगले घडले. भाऊराव पाटील यांनी संस्थेची उभारणी केली. पुढच्या काळात त्यांच्या संस्कारात वाढलेल्या मुलांनी संस्थेचा प्रचंड विस्तार केला. आम्ही कॉलेजला शिक्षक झालो तेव्हा हिंमतीने कामे केली. आज बाडसारखी मुले स्वतःचा व्यवसाय करून मोठी प्रगती करतात. शिक्षकाला दुसरे काय लागते? विद्यार्थी चांगले घडल्याचा आनंद शिक्षकास मोठा असतो,’ असे विचार
‘पुणे-सातारा महामार्गावर वेळे खंबाटकी घाट पायथ्याला उभा असलेला छत्रपती शिवरायांच्या पन्नास फुटी अश्वारूढ पुतळ्याला व सातारा राजधानी सेल्फी पॉइंटला कोण हात लावेल, त्याची माझ्याशी गाठ आहे. पुतळ्याला स्पर्श केला तरी त्याला किंमत मोजावी लागेल. खबरदार स्वतः मी अश्वारुढ पुतळ्याच्या तिथे उभा राहतो, बघूया कोणाची हिंमत आहे त्या पुतळ्याच्या जवळ यायची,’ असा इशारा छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा. उदयनराजे भोसले यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अतिक्रमण विभागाला दिला.
‘मध्ययुगीन काळात अनेक सत्तांनी अनियंत्रित राजेशाहींचा अवलंब केला असताना शिवाजी महाराजांनी कल्याणकारी राजेशाहीचा अवलंब केला. शिवकाळातील राजकारण हे समाजहितासाठी होते. जनतेच्या अडचणी सोडविणे त्यांना वेळेत न्याय मिळवून देणे, या गोष्टी महाराज स्वतःचे आद्यकर्तव्य समजत होते. शिवाजी महाराज म्हणजे भविष्याचा वेध घेणारे एक महान असे कर्मयोगी राजे होते. समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ महाराजांनी अंधकारमय समजल्या जाणार्या मध्ययुगातच रोवली ही गोष्ट नक्कीच आजच्या राजकारणाला, सत्तेलाही मार्गदर्शक ठरावी अशीच आहे,’ अ