भिलार (ता. महाबळेश्वर) येथे मंगळवारी रात्री दोन दुचाकींच्या भीषण अपघातात श्वेता शशिकांत ओंबळे (वय 23) ही युवती ठार जाली असून, अनिकेत आनंदा चिकणे (वय 20) गंभीर जखमी तर अन्य एक जखमी झाला आहे.
पाचगणी : भिलार (ता. महाबळेश्वर) येथे मंगळवारी रात्री दोन दुचाकींच्या भीषण अपघातात श्वेता शशिकांत ओंबळे (वय 23) ही युवती ठार जाली असून, अनिकेत आनंदा चिकणे (वय 20) गंभीर जखमी तर अन्य एक जखमी झाला आहे.
याबाबतची पाचगणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि. 23) भिलार येथील किंगबेरी फॅक्टरी समोर रात्री 10.45च्या सुमारास मोटारसायकल प्लसर क्र. (एमएच 11 बीयू 803) व स्प्लेंडर क्र. (एमएच बी 8720) यांचा भीषण अपघात झाल्याची फिर्याद विश्वनाथ काशिनाथ ओंबळे यांनी दिली आहे. फिर्यादित म्हटल्याप्रमाणे, मंगळवारी (दि. 23) रात्री 10:45च्या फिर्यादीची मुलगी श्वेता शशिकांत ओंबळे काही कामानिमित्त मावसभाऊ अनिकेत आनंदा चिकणे सोबत भिलार येथून भौसे येथे जाण्यास प्लसर (एमएच 11 बीयू 803) गेली होती.
साधारणतः साडेअकराच्या सुमारास फिर्यादीची वहिनी मंगल यांच्या फोनवर आमच्या गावातील किंगबेरी जवळच येथे राहणार्या वैशाली भिलारे यांनी मुलीच्या अपघाताबाबत माहिती दिली यावरून आम्ही घरातील सर्वजण अपघात स्थळी पोहोचलो. त्यावेळी तेथे उपस्थित असणार्या लोकांनी त्यांना बेल एअर येथे उपचारार्थ नेल्याचे सांगितले.
आम्ही तत्काळ पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. तेथील डॉक्टरांनी स्वेता हिची परिस्थिती गंभीर असल्याने तिला पुढील उपचाराकरिता सातारा येथे हलविण्यास सांगितल. तिला घेऊन जात असतानाच रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली.
या घटनेची पोलीस स्टेशनला प्राणघातक अपघात अशी नोंद झाली आहे.
या अपघाताचा अधिक तपास सपोनि सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुळीक करीत आहेत.