maharashtra

महाबळेश्वरमध्ये पर्यटक युवतीचा विनयभंग


Tourist girl molested in Mahabaleshwar
महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड परिसरातील एका खाजगी बंगल्यात पुणे येथून आलेल्या पर्यटक कुटुंबियां समवेत लहान मुलाचे संगोपनाचे काम करणाऱ्या एका मदतनीस युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. बंगल्यातील केअर टेकरने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून त्याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड परिसरातील एका खाजगी बंगल्यात पुणे येथून आलेल्या पर्यटक कुटुंबियां समवेत लहान मुलाचे संगोपनाचे काम करणाऱ्या एका मदतनीस युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. बंगल्यातील केअर टेकरने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून त्याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय कुमार प्रजापती (वय- 26) असे या संशयिताचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वर पर्यटनास पुणे येथून पर्यटक कुटुंबीय दोन दिवसांसाठी ऑनलाईन बुकिंग करून मेटगुताड परिसरातील गॅप्सन पॅलेस बंगलो येथे शुक्रवारी दुपारी पोहचले. या पर्यटक कुटुंबासमवेतच लहान मुलाचे संगोपनाचे काम करणारी एक मदतनीस युवती व इतर दोन केअर टेकर देखील होते. रात्री पर्यटक कुटुंबीय झोपायला गेले असता, या युवतीच्या खोलीमध्ये मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास या बंगल्याच्या देखभालीसाठी असलेल्या बंगल्याचा केअर टेकर विजय कुमार प्रजापती हा दारुचे नशेत होता. संशयित विजय याने त्याचेकडे असलेल्या दुसऱ्या चावीने त्याने खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला व विनयभंग केल्याचे तक्रारीत पीडित युवतीने म्हंटले आहे.
शनिवारी दुपारी या प्रकरणी पर्यटक कुटुंबियांसह येऊन या युवतीने महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महाबळेश्वर पोलिसांनी विजय कुमार प्रजापती या संशयित केअर टेकरच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे.