sports

मलकापूरच्या ‘जननी चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे खिंगर व भिलार येथे पीपीई किटचे वितरण 


जननी चॅरिटेबल ट्रस्ट मलकापूर यांच्यातर्फे पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर साहित्याचे वितरण ग्रामपंचायत खिंगर व भिलार येथे करण्यात आले.

पाचगणी : जननी चॅरिटेबल ट्रस्ट मलकापूर यांच्यातर्फे पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर साहित्याचे वितरण ग्रामपंचायत खिंगर व भिलार येथे करण्यात आले.

जननी चॅरिटेबल ट्रस्ट मलकापूर या संस्थेच्यावतीने विविध समाजोपयोगी कामे केली जातात. ग्रामीण भागात कोव्हीड योद्ध्यांचे संरक्षण व्हावे, या हेतूने ट्रस्टच्या माध्यमातून पीपीई किट, ऑक्सिमीटर आदी साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी तालुक्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, तालुका आरोग्य अधिकारी अजित कदम, जननी ट्रस्टचे अध्यक्ष संदीप फुके, महादेव काळे, महादेव खानोलकर, प्रवीण भिलारे, सुरेंद्र भिलारे, ग्रामपंचायत प्रशासक सुनील पार्टे, माजी सरपंच उज्ज्वला दुधाणे, ग्रामसेविका सपना जाधव, सुनीता दुधाणे, अशोक दुधाणे, गणपत भिलारे, सत्यवान रांजणे, केतन भिलारे, सुरेश दुधाणे (गुरुजी), विलास दुधाणे, विठ्ठल दुधाणे, स्वाती वंजारी, राहुल दुधाणे आदी उपस्थित होते.


शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर पीपीई किट आणि आवश्यक उपकरणांची मोठी मागणी आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘जननी चॅरिटेबल ट्रस्ट’ने कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी पीपीई कीट, सॅनिटायझर, मास्क, हँड ग्लोज, बीपी मॉनिटरिंग मशीन, ऑक्सिमीटर आणि संबंधित कीट दान केल्याने या ट्रस्टचे कार्य उल्लेखनीय आहे. 
- बाळासाहेब भिलारे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी तालुका महाबळेश्‍वर