गुरेघरच्या शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळे फोडणार्या तिघांना अटक
पाचगणी पोलिसांची कारवाई : चोरीस गेलेली सर्व रक्कम हस्तगत
गुरेघर (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामपंचायत शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळ्यामध्ये राहुल प्रकाश सणस (वय 43, रा. 245 गंगापुरी, ता. वाई) यांचे दुकान असून, हे दुकान व शेजारील पाच दुकाने दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 9 वाजल्यापासून दि. 21 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 6च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी व त्यांचे शेजारील असे एकूण पाच दुकानांचे शटर कशाच्यातरी सहाय्याने उचकटून आत प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातील एकूण 4200 रुपये रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेल्याची घटना घडली होती.
पाचगणी : गुरेघर (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामपंचायत शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळ्यामध्ये राहुल प्रकाश सणस (वय 43, रा. 245 गंगापुरी, ता. वाई) यांचे दुकान असून, हे दुकान व शेजारील पाच दुकाने दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 9 वाजल्यापासून दि. 21 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 6च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी व त्यांचे शेजारील असे एकूण पाच दुकानांचे शटर कशाच्यातरी सहाय्याने उचकटून आत प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातील एकूण 4200 रुपये रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेल्याची घटना घडली होती.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात राहुल प्रकाश सणस यांनी फिर्याद दिली होती यावरून पाचगणी पोलिसांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे, पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. शिवाजी पांबरे, सहा. फौजदार संतोष कदम, पो.ना विजय मुळे, पो.ना जितेंद्र कांबळे यांनी सदरचा गुन्हा तपास करीत उघडकीस आणून दाखल गुन्ह्यात सनी सुरेश जाधव (वय 26), सागर सुरेश जाधव (वय 24) व अक्षय गोरख माळी (वय 19, सर्व रा. गुरेबाजार, सिद्घनाथवाडी, वाई) या तीन आरोपींना अटक केले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेली सर्व रोख रक्कम हस्तगत केली आहे.
या तिघांविरुद्ध पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.