sports

पाचगणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी


जगभरात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. या भयंकर विषाणूचा प्रादुर्भाव पाचगणी शहर व परिसरात झाला असून, नुकतेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक विठ्ठल (तात्या) बगाडे यांचे आकस्मित निधन झाल्याने दरवर्षी धूमधडाक्यात सार्वजनिकरीत्या साजर्‍या होणार्‍या या वार्षिक आनंदोत्सवावर विरजण पडले आहे. त्यामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती बुधवारी (दि. 14) शहरात साधेपणाने साजरी करण्यात आली.

पाचगणी : जगभरात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. या भयंकर विषाणूचा प्रादुर्भाव पाचगणी शहर व परिसरात झाला असून, नुकतेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक विठ्ठल (तात्या) बगाडे यांचे आकस्मित निधन झाल्याने दरवर्षी धूमधडाक्यात सार्वजनिकरीत्या साजर्‍या होणार्‍या या वार्षिक आनंदोत्सवावर विरजण पडले आहे. त्यामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती बुधवारी (दि. 14) शहरात साधेपणाने साजरी करण्यात आली.

जयंती उत्साहात शहर व परिसरातील विविध तरुण मंडळाचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे जयंती साधेपणाने साजरी करावी, असे अवाहन पाचगणीचे सपोनि सतीश पवार यांनी केले होते, त्यानुसार जयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय जयंती उत्सव मंडळांनी घेतला.

13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सूत्रपठन ग्रहण करण्यात आले.

सकाळी साडेदहा वाजता नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर, उपनगराध्यक्ष विनोद बिरामणे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, नगरसेवक व कर्मचार्‍यांनी सामाजिक अंतर राखत पालिका कार्यालयातील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सकाळी अकरा वाजता शहर व परिसरातील जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सूत्रपठन व बुद्ध वंदना घेण्यात आली.

यावेळी प्रकाश मोरे (गुरुजी), राजू काकडे, दीपक कांबळे, सुधीर भोसले, अशोक कदम, महेंद्र सोनावणे, रूपेश बगाडे, प्रकाश भालेराव, अनमोल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.