maharashtra

जावली, महाबळेश्वर, पाटण, सातारा तालुक्यात पावसाची पुन्हा जोरदार बॅटिंग

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

कोयना धरण पाणलोट क्षेत्राात पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी सकाळपासूनही मुसळधार पाऊस सुरुच आहे. आज, सकाळी मिळालेल्या माहितीनुसार गत चोवीस तासात धरणात सव्वा दोन टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणात 68.89 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे.

सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्राात पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी सकाळपासूनही मुसळधार पाऊस सुरुच आहे. आज, सकाळी मिळालेल्या माहितीनुसार गत चोवीस तासात धरणात सव्वा दोन टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणात 68.89 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे. सध्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद 17 हजार क्युसेकवर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात धरणात तब्बल 2.21 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. दरम्यान, जावली, महाबळेश्वर, पाटण, सातारा तालुक्यात आज पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग केली. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून गत २४ तासात धरणात सव्वादोन टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. दुसरीकडे महाबळेश्वरमध्ये १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आषाढी एकादशी झाल्यानंतर अचानक पावसाने ओढ दिली. दरम्यानच्या काळात बळीराजांनी पिकांची खुरपणीची कामे केली. गत गुरुवारपासून सातारा जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली. ही तडाखेबंद बॅटिंग गेल्या  पाच दिवसांपासून सुरूच असल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होऊन गेले आहे. रविवारी सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत सातारा शहर व परिसराला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शहर व परिसरातील गटारे तुंबून रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले. रविवार हा सुट्टीचा वार असल्यामुळे अनेक शासकीय, निमशासकीय  कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी घरी थांबणेच पसंत केले. सोमवारी ही दुपारपर्यंत शहरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या. सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी गेल्या पाच दिवस पडत असलेल्या पावसाने काही ठिकाणी नुकसान झाल्याचे वृत्त आहे मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे महसूल विभागाला पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ६० किमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळपासूनच सातारा शहरात संततधार पावसाला सुरुवात झाली. अधेमध्ये मुसळधार पावसाच्या जोरदार सरी पडू लागल्यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होते. रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसून येत होती. शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. ग्राहकाअभावी भाजी मंडई, दुकाने ओस पडल्याचे चित्र दिसून येत होते. पावसाळ्यापूर्वी पालिकेच्या माध्यमातून नाल्यांची सफाई करण्यात आली असली तरी बहुतांश ठिकाणी शहरात कचऱ्यामुळे नाले तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे काही ठिकाणी दुर्गंधी येत होती. सातारा शहर परिसरात असणाऱ्या उपनगरांनाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. काही ठिकाणी पावसाचे पाणी झोपडपट्टीमध्ये शिरल्यामुळे तेथील नागरिकांची धांदल उडाली.