थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर नगरीत निसर्गाचा मनमुरादपणे आनंद घेऊन झोपलेल्या पर्यटकांची झोप मोड झाली आहे. चक्क बाजारपेठेत रात्रीच्या वेळी गवा शिरल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली आहे.
महाबळेश्वर : थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर नगरीत निसर्गाचा मनमुरादपणे आनंद घेऊन झोपलेल्या पर्यटकांची झोप मोड झाली आहे. चक्क बाजारपेठेत रात्रीच्या वेळी गवा शिरल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली आहे.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा व स्वागत करण्यासाठी शेकडो पर्यटकांना महाबळेश्वरच्या निसर्ग सौंदर्याने आकर्षित केले आहे. लॉकडाउनचे संकट घोगावत असतानाही जिल्हा प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून अनेक व्यवसायिकांनी व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. त्याच बरोबर वन्यजीव प्राणी यांच्या आदिवसात अतिक्रमणे केली आहेत, त्याचा पुरावा म्हणून आता कळपातील एक गवा थेट रात्रीच्या वेळी बाजारपेठेत दाखल झाल्याने ऐन थंडीत गव्याचा पाठलाग करताना तरुणांना अक्षरशः घाम फुटला आहे.
याबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास भविष्यात गव्याचा कळप बाजारपेठेत व नागरी वस्ती मध्ये शिरकाव करण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास जंगलातील वाट चुकलेला गवा शांतपणे रस्त्यावरून मार्गक्रमण करीत असल्याचे चित्रीकरण महाबळेश्वर येथील धाडसी तरुणांनी त्वरित सॊशल मीडियावर व्हायरल करून सावधगिरी बाळगण्यास मदत केली आहे. दुपारपर्यंत याबाबत महाबळेश्वर येथील स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही स्वरूपाची अधिकृतपणे माहिती प्रसारित केली नाही. त्यामुळे अनेक व्यवसायिक व पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री नऊच्या आत घर व हॉटेलात अशी काहीची मानसिकता बनली आहे. दरम्यान, पर्यटक व नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन महाबळेश्वर येथील हॉटेल व्यवसायिक व नगरसेवक कुमार शिंदे, प्रशांत आखाडे व नगराध्यक्षा सौ सोनाली शिंदे आणि अन्य व्यवसायिकांनी केले आहे.