maharashtra

महाबळेश्‍वरच्या माजी नगराध्यक्षांच्या भ्रष्ट्राचाराचा अहवाल शासनाकडे सादर


Corruption report of former mayor of Mahabaleshwar submitted to the government
महाबळेश्‍वरच्या माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या महाबळेश्‍वर नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात भ्रष्ट्राचार केल्याप्रकरणी शिवसेना युवासेना उप जिल्हाप्रमुख सचिन वागदरे यांनी नगरविकास खात्याकडे केलेल्या तक्रारीवरुन माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्यधिकारी अमिता दगडे पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांना देण्यात आले होते.

पाचगणी : महाबळेश्‍वरच्या माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या महाबळेश्‍वर नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात भ्रष्ट्राचार केल्याप्रकरणी शिवसेना युवासेना उप जिल्हाप्रमुख सचिन वागदरे यांनी नगरविकास खात्याकडे केलेल्या तक्रारीवरुन माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्यधिकारी अमिता दगडे पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांना देण्यात आले होते.
जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्यातर्फे नगरविकास खात्याला अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे महाबळेश्‍वर निवडणुकीच्या अगोदरच तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील व माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे याच्यावर कारवाईची टांगती तलवार उभी राहील्याने महाबळेश्‍वरमध्ये खळबळ उडाली आहे. महाबळेश्‍वर नगरपालिकेच्या भ्रष्ट्राचाराबात सातारा जिल्हा युवासेना उप जिल्हाप्रमुख सचिन वागदरे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये महाबळेश्‍वर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा व तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी स्वच्छता अभियानामधील करोडो रुपयाच्या निविदामध्ये कोणत्याही कायदेशीर पद्धतीचा अंवलंब न करता, तांत्रिक मंजुरी न घेता आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना निविदा दिल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वच्छता अभियानात नियमबाह्य कामे करुन मनमानी अवास्तव रक्कम लावुन बिले काढली आहेत. त्याचप्रमाणे कचरा डेपो, रंगरंगोटी, घंटागाडी खरेदी, डस्टबीन खरेदी, कॅमेरा लेन्स खरेदी, स्वच्छता अभियानात ऍडव्हरटायजिंग करीता दिलेले टेडर घोटाळा, यतिराज बांधकाम कंपनीच्या बांधकाम ठेक्याबाबत स्वच्छता जनजागृती करीता वापलेल्या सामग्रीमध्ये नियमबाह्यता, सोशल मिडीया जनजागृतीमध्ये अवास्तव व भरमसाठ बीलाची केलेली वाढ, बोगस कर्मचारी दाखवुन बील काढुन कोटी रुपयांचा चुना नगरपालिका प्रशासनाने लावला असल्याची तक्रार युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन वागदरे यांनी केली होती.
दरम्यान, जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी नगरविकास खात्याचे उपसचिव यांना पाठवलेल्या अहवालात चौकशी अधिकार्‍यांच्या चौकशी अहवालात फार गंभीर बाबी नमुद केल्या आहेत. महाबळेश्‍वर नगरपालिकेने खरेदी केलेल्या मशिनरी व साहित्य खरेदी नियमबाह्य व आर्थीक देयके देताना नियमबाह्यता हा अहवालात चौकशी अधिकारी यांनी ठपका ठेवला आहे. मलनिस्सारण केद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या निविदेमध्ये घोळ, नगरपालिकेचे नुकसान करुन प्रदुषण कर व प्रवासी कराचा नियमबाह्य ठेका, यतिराज कन्स्ट्रक्शनला रंगरगोटीसाठी दिलेला ठेका व यतिराज कन्स्ट्रक्शन्स कपनीला काढलेली नियमबाह्य बिले, अशा विविध मुद्द्यांवर चौकशी अहवालात भ्रष्ट्राचार केला असल्याचा ठपका चौकशी अधिकारी यांनी चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. दरम्यान राज्याचे माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणुन राज्याचा कारभार सांभाळत आहेत. माजी नगराध्यक्षा व तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यावरील भ्रष्ट्राचाराची पोलखोल नगरविकास खात्याकडे दाखल अहवालात चौकशी अधिकार्‍यांकडुन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत शिंदे सरकार काय भूमिका महाबळेश्‍वर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर घेणार, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे. तर माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या पदाचा गैरवापर करुन आर्थिक अनियमितता व भ्रष्ट्राचार केला असल्याचे चौकशी अहवालात चौकशी अधिकार्‍यांनी स्पष्ट केल्याने महाबळेश्‍वरच्या राजकारणात माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.