गेल्या अनेक दिवसांपासून ऑक्टोबरच्या उन्हामुळे घाम येत असतानाच आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. बहुतांश जिल्ह्यातील विशेषतः पुण्याचे किमान तापमान सोळा अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले असून दिवाळीच्या आसपास तापमान आणखी कमी होणार आहे. महाबळेश्वर हे सर्वाधिक थंड पर्यटन स्थळ बनले असून तेथे तापमान १४.८ अंश सेल्शियस इतके आहे.
महाबळेश्वर : गेल्या अनेक दिवसांपासून ऑक्टोबरच्या उन्हामुळे घाम येत असतानाच आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. बहुतांश जिल्ह्यातील विशेषतः पुण्याचे किमान तापमान सोळा अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले असून दिवाळीच्या आसपास तापमान आणखी कमी होणार आहे. महाबळेश्वर हे सर्वाधिक थंड पर्यटन स्थळ बनले असून तेथे तापमान १४.८ अंश सेल्शियस इतके आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून १६ ते १८ अंशाच्या आसपास आहे. दिवसा उन्हाचा तडाखा बसत असला तरी रात्रीच्या वातावरणातील गारवा नागरिकांना दिलासा देत आहे. सायंकाळनंतर गार वारे वाहत असून, यात भर पडणार आहे.
राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरी नोंदविण्यात आले आहे.
प्रमुख शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअस
मुंबई २४.५, पुणे १७, जळगाव १७.६, महाबळेश्वर १४.८, नाशिक १६.१, सातारा १८.५, सोलापूर १७.४, औरंगाबाद १६.२, परभणी १८.९ नांदेड १८, अमरावती १६.८, बुलडाणा १८, नागपूर १७.७