महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करणार : खा. शरदचंद्रजी पवार
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व लगतचे तालुक्यांमध्ये स्ट्रॅाबेरी पिकाचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. महाबळेश्वर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनाचे ठिकाण असून शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पिक आहे. देशामध्ये ४००० एकर क्षेत्रावर स्ट्रॅाबेरी पिकाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी ३००० एकर क्षेत्र हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व लगतच्या तालुक्यातील आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व लगतचे तालुक्यांमध्ये स्ट्रॅाबेरी पिकाचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. महाबळेश्वर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनाचे ठिकाण असून शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पिक आहे. देशामध्ये ४००० एकर क्षेत्रावर स्ट्रॅाबेरी पिकाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी ३००० एकर क्षेत्र हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व लगतच्या तालुक्यातील आहे. तसेच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटकांची नेहमीच वर्दळ असलेने शेतकऱ्यांना या पिकापासून चांगला आर्थिक लाभ होत आहे. स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क तसेच इतर कर कमी करणे, महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी व स्ट्रॅाबेरी रोपांचा अलगीकरण कालावधी पूर्वी प्रमाणेच ३ ते ४ महिने करण्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा तसेच सर्वतोपरी मदत करणार असलेचे खा. शरदचंद्रजी पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना लागवडीसाठी स्ट्रॅाबेरी पिकाची (मदर प्लॅन्ट) स्विट चार्ली, कॅमारोझा व विंटर डाऊन या जातींची रोपे आयात करावी लागतात. आयात शुल्क व इतर कर वाढलेने रोपे खरेदी व उत्पादन खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेने शेतकऱ्यांना आर्थिक तोषिस लागत आहे. सातारा जिल्हा बँक नेहमीच शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून स्ट्रॅाबेरी पिकाचे आयात शुल्क कमी होण्यासाठी व बेरी पिक लागवडीस चालना मिळणेसाठी केंद्र शासनाच्या योजनेतून महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी स्ट्रॅाबेरी ग्रोवर्स असोसिएशन व जिल्हा बँकेच्या यांच्यावतीने बँकेचे संचालक आ. मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी मा. खा.शरदचंद्रजी पवार यांना निवेदन दिले.
यावेळी पवार यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वंकष कामकाजाबद्दल गोरवोद्गार काढले. सातारा जिल्हा बँक बँकिंग कामकाजाबरोबर सर्वसामान्याच्या आर्थिक विकासासाठी कायमच अग्रेसर आहे. यावेळी सातारा जिल्हा हा क्रांतीकारकांचा जिल्हा असून या जिल्ह्याचे नांव देशामध्ये अग्रक्रमाने घेतले जाते. याच बरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नावलौकीक देशभर असून बँक कामकाजाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत विकासाभिमुख केलेले कामकाज हे देशातील सहकारी बँकांसाठी आदर्शवत असलेचे खा.शरदचंद्रजी पवार यांनी प्रतिपादन केले.
आ. मकरंद पाटील म्हणाले, केंद्र शासनाचे महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ च्या माध्यमातून बेरी फळ पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन, प्रशिक्षण तसेच उत्पादनात वाढ व मार्गदर्शन तसेच मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. याच धरतीवर बेरी पिकासाठी 'एक्सलन्स सेंटर' उभारणी करून या माध्यमातून स्ट्रॅाबेरी प्रमाणे रासबेरी, ब्ल्यूबेरी, गोल्डनबेरी, मलबेरी इत्यादी फळ पिकांसाठी लागवडीस चालना दिली तर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सदर पिक लागवडीसाठी आवश्यक असणारी नवीन जातींची रोपे आयात केलेस उत्पादनात मोठी वाढ होवून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
या व्यतिरिक्त स्ट्रॅाबेरी पिकासाठी पिक अलग ठेवणेचा कालावधी पूर्वी प्रमाणेच ३ ते ४ महिने इतका कालावधी केलेस रोपे वेळेत आयात करणे शक्य होणार असलेचे यावेळी राजेंद्र राजपुरे यांनी नमूद केले.
यावेळी सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी जिल्हा बँकेने आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच स्ट्रॅाबेरी रोपांचे आयात शुल्क व बेरीज एक्स्लन्स सेंटर उभारणी कामी पाठपुरावा करण्याची विनंती केली.
एसिया पॅसिफीक रिजनचे व्हाईस पे्रसिडेंट भारत भोजने यांनी स्ट्रॅाबेरी पिकासंबंधी शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी मांडल्या, बेरी या पिकासाठी येथील वातावरण पोषक असून उत्पादन वाढीस वाव असलेचे सांगितले. एसिया पॅसिफीक रिजनचे माध्यमातून येथील स्ट्रॅाबेरी व बेरी फळ पिकासाठी मदत करणार असलेचे आवर्जुन नमूद केले.
याप्रसंगी खा. शरदचंद्रजी पवार यांचा आ. मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे तसेच डॉ. राजेंद्र सरकाळे, भारत भोजने यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.