महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या महाबळेश्वर तालुकाध्यक्षपदी नितीन सदाशिव मालुसरे यांची निवड करण्यात आली. सदरील निवड संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष एस. आर. भोगावकर यांनी केली.
पाचगणी : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या महाबळेश्वर तालुकाध्यक्षपदी नितीन सदाशिव मालुसरे यांची निवड करण्यात आली. सदरील निवड संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष एस. आर. भोगावकर यांनी केली.
गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष भोगावकर यांच्या हस्ते नितीन मालुसरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी भ्रष्टाचार विरधी जन आंदोलन न्यासचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल शिंदे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे सातारा शहराध्यक्ष संदीप माने, भाजप सरचिटणीस संतोष प्रभुणे, गोडवलीचे सरपंच, मंगेश पवार, उपसरपंच विष्णू मालुसरे, अंकुश मालुसरे, संदीप मालुसरे, माजी सरपंच सुरेश मालुसरे, तुकाराम मालुसरे, सुरेश मालुसरे, पोलीस पाटील विशाल पवार, बापू शिंदे, मंगेश मालुसरे, योगेश मालुसरे, अजय कांबळे, हनुमंत मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष भोगावकर म्हणाले, ‘महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना कुठल्याही राजकीय पक्षाशी कुठल्याही राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. पोलीस आणि पोलीस कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी लढणारी महाराष्ट्रातील एकमेव अराजकीय सामाजिक संघटना आहे.राजकीय, सामाजिक कार्यामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम संघटना प्रत्येक वेळेस करत असते. म्हणून या संघटनेवर विश्वास ठेवून युवक संघटनेचे काम करण्याची इच्छा बाळगत असतात. नितीन मालुसरे यांचे कार्य पाहून आम्ही त्यांची निवड केली आहे.
या कार्यक्रमास ग्रामस्थ उपस्थित होते. अंकुश मालुसरे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप मालुसरे यांनी आभार मानले.