जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन : प्रतापगडावर पोलिसांचा चोख बंदोबस्त
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर किल्ले प्रतापगड परिसरात जिल्हा प्रशासने 144 कलम लागू केल्याने तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने यावर्षी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन अत्यंत साधेपणाने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शासनाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
महाबळेश्वर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर किल्ले प्रतापगड परिसरात जिल्हा प्रशासने 144 कलम लागू केल्याने तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने यावर्षी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन अत्यंत साधेपणाने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शासनाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अफझल खानाचा वध करून छत्रपती शिवाजी महराजांनी हिंदवी स्वराजाची मुहूर्त मेढ रोवली. या शिवरायांच्या पराक्रमानिमित्त दरवर्षी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन शिवप्रेमी, प्रतिनिधी, प्रतापगड पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या सहभागाने छत्रपती शिवरायांचा व भवानी मातेचा जयजयकार करीत पारंपरिक पद्धतीने मोठ्या जल्लोषात शासनाच्या वतीने व स्थानिकांच्या सहभागाने मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. याच वेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे खेळ, ढोल-लेझीम पथके यांचा सहभाग, शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, छत्रपतींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक व छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्प वृष्टी तसेच शिवरायांच्या जीवनावरील पोवाडे गायन आदी भरगच्च कार्यक्रम हे दरवर्षीच्या येथील शिवप्रताप दिनाचे खास वैशिष्ट असते. पूर्वी हा सोहळा प्रतापगड उत्सव समिती व महाराष्ट्रातील विविध भागातील शिवप्रेमी मोठ्या जल्लोषात साजरे करायचे. त्यानंतर गेल्या 10-12 वर्षांपासून आजतागायत शासनाच्या वतीने तो साजरा केला जातो.
मात्र, यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर किल्ले प्रतापगड परिसरात जिल्हा प्रशासने 144 कलम लागू केल्याने तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन अत्यंत साधेपणाने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत केवळ शासनाच्या वतीने व सहभागातूनच पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मात्र नेहमी दिसणारे शालेय विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व शिवप्रेमिच्या सहभाग यांचा अभाव चांगलाच जाणवत होता. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.किल्ल्याकडे येणार्या प्रत्येक रस्त्यांवर व ठिकाणी सर्वांचे पोलीस खात्याच्या वतीने तपासणी केली जात होती. तसेच गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी सर्वांची कसून तपासणी करून त्यांना किल्ल्यात प्रवेश दिला जात होता.
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास यावर्षीच्या या सुदिनाच्या कार्यक्रमाने प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते भवानी मातेची पूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी डीवायएसपी डॉ. शीतल जानवे-खराडे, वाईच्या उपविभागीय अधिकारी संगीता राजापूरकर, उप वनसंरक्षक हाडा, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक कोंडूभैरी, गटविकास अधिकारी नारायण घोलप, भवानी मातेचे पारंपरिक सेवेकरी विजय हवालदार, अभय हवालदार, भवानी माता मंदिर व्यवस्थापक ओमकार देशपांडे, पुजारी मंगेश बडवे, ओमकार दंडवते, प्रमोद पवार, आनंदा उतेकर, चंद्रकांत आप्पा उतेकर, विलास मोरे तसेच प्रतापगड ग्रामस्थ उपस्थित होते.
भवानी मातेच्या मंदीरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणार्या भगव्या ध्वजारोहण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची शिवमुर्ती असलेल्या या पालखीची मिरवणुक सुरू झाली. जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी पालखीचे भोई होऊन पालखीचा शुभारंभ केला त्यानंतर शिवप्रेमी ग्रामस्थांनी जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात सामाजिक अंतर राखून शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत पालखी नेली. त्यानंतर पुतळ्या समोरील ध्वजस्तंभावर भगव्याचे ध्वजारोहण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले यावेळी सर्व शासकीय अधिकारी ,मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर शिवरायांच्या अश्वारूढ शिवपुतळ्याचे पूजन व जलाभिषेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारून गेले होते. याच वेळी सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली.
मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने किल्ले प्रतापगड परिसरात जिल्हा प्रशासने 144 कलम लागू केल्याने व या वर्षी प्रतापगड परिसरात शुकशुकाट दिसत होता बाहेरचे शिवप्रेमी व विध्यार्थी वगैरे नव्हते. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त होता. सर्व कार्यक्रम शांततेत व जल्लोषात साजरा झाला.