महाबळेश्वर तालुक्यात कोरोना महामारीने थैमान घातले असून, अजूनही लोकांना कोरोनाची भीती व गांभीर्य नसल्या कारणामुळे काहीजण मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. अशा लोकांवर पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार व सहकार्यांनी अचानकपणे पाचगणी बाजारपेठ, बसस्थानक, शॉपिंग सेंटर परिसरात मोहीम राबवून जनतेमध्ये मास्क न वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, गाडीत एकापेक्षा जास्त व्यक्ती असताना मास्क न वापरणे, दुकानात ग्राहकांनी एकमेकांमध्ये 6 फुटांपेक्
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात कोरोना महामारीने थैमान घातले असून, अजूनही लोकांना कोरोनाची भीती व गांभीर्य नसल्या कारणामुळे काहीजण मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. अशा लोकांवर पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार व सहकार्यांनी अचानकपणे पाचगणी बाजारपेठ, बसस्थानक, शॉपिंग सेंटर परिसरात मोहीम राबवून जनतेमध्ये मास्क न वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, गाडीत एकापेक्षा जास्त व्यक्ती असताना मास्क न वापरणे, दुकानात ग्राहकांनी एकमेकांमध्ये 6 फुटांपेक्षा जास्त अंतर न ठेवणे अशा नागरिक व दुकानदारांवर कारवाईचा दणका दिला असून, दोन तासांत सुमारे 20 हजार दंड वसूल केला आहे.
पोलीस व पालिकेच्या या संयुक्त कारवाईमुळे पाचगणी शहरामध्ये आता विना मास्क व सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे विना मास्क रस्त्यावर फिराल तर थेट पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. हा मेसेज लोकांपर्यंत गेला आहे. त्यामुळे आता शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. याची जाणीव नागरिकांना होऊ लागली आहे.