महाबळेश्वर तहसीलदार यांनी पदाचा गैरवापर करून खाजगी गाडीवर बेकायदेशीर अंबर दिवा लावल्याप्रकरणी सातारा वाहतूक शाखेने कारवाई केली आहे.
सातारा : महाबळेश्वर तहसीलदार यांनी पदाचा गैरवापर करून खाजगी गाडीवर बेकायदेशीर अंबर दिवा लावल्याप्रकरणी सातारा वाहतूक शाखेने कारवाई केली आहे.
महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी यांनी पदाचा गैरवापर करून खाजगी गाडीवर बेकायदेशीर अंबर दिवा लावल्याप्रकरणी सातारा वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. तहसीलदार सुषमा चौधरी यांच्या खाजगी गाडीमध्ये महाराष्ट्र शासन तहसीलदार महाबळेश्वर अशी पाटी लावण्यात आली होती. बेकायदेशीररित्या अंबर दिवा लावल्याचे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी तत्काळ सातारा आर. टी. ओ कार्यालय व वाहतूक शाखा सातारा यांच्याशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली. या खाजगी वाहन मालकाने महसूल कार्यालयाशी कोणताही करार केलेला नसताना महाबळेश्वर तहसिलदार ही गाडी अंबर दिवा लावून वापरत होते. वाहतूक पोलिसांच्याकडून या वाहनावर दंडात्मक कारवाई तर होईलच, पण असा बेकायदेशीर अंबर दिवा लावून गाडी वापरणार्या तहसीलदारांवर कारवाई होणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. यापुढचा प्रताप म्हणजे सरकारी वाहकास कार्यालयात थांबवून कार्यलयातील स्वीपरला वाहक म्हणून आणले होते. यातील गौडबंगाल हे त्यांनाच माहित. अशी कारवाई झाल्यानंतर घटनास्थळी उपस्थितांकडून कुजबुज दिसून येत होती. अशा कायद्यास न जुमानणार्या तहसीलदारांवर नूतन जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थितांकडून निर्माण होत होता.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात महाबळेश्वर तहसीलदार यांनी आणलेली ही गाडी मुख्यतः सातारा जिल्ह्यामधील नसून हि गाडी पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यामधील आहे. तसेच या गाडीचा महसूल कार्यलयाशी कोणताही करार झालेला नाही. तहसीलदार महाबळेश्वर हे कोणताही कायद्याला मानत नसून कायद्याची पायमल्ली करताना दिसून येत आहेत. शासकीय वाहन चालकाला ऑफिस मध्ये बसवून स्विपरला चालक म्हणून फिरवताना दिसत असून यावर नूतन सातारा जिल्हाधिकारी योग्य ती कारवाई करतील का?
- महारुद्र तिकुंडे, माहिती अधिकार, संस्थापक-अध्यक्ष युवा राज्य फौंडेशन.