sports

लोक न्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत

शैलेश कंठे यांचे आवाहन : महाबळेश्‍वरमध्ये राष्ट्रीय लोक न्यायालय संपन्न

‘लोक न्यायालय ही लोकाभिमुख चळवळ आहे. त्यामुळे आर्थिक आणि वेळेची मोठी बचत होत असून, दोघा पक्षकारांमधील समेटामुळे त्यांच्यात ऋणानुबंध निर्माण होतो. त्याचबरोबर भांडणात वेळ गेल्याने कुटुंबाची खुंटलेली प्रगती लोक न्यायालयातील समेटामुळे पक्षकाराला साधता येते. त्यामुळे लोक न्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत,’ असे अवाहन तालुका विधी सेवा संघाचे अध्यक्ष दिवाणी व फौजदारी न्यायाधीश शैलेश कंठे यांनी केले.

पाचगणी : ‘लोक न्यायालय ही लोकाभिमुख चळवळ आहे. त्यामुळे आर्थिक आणि वेळेची मोठी बचत होत असून, दोघा पक्षकारांमधील समेटामुळे त्यांच्यात ऋणानुबंध निर्माण होतो. त्याचबरोबर भांडणात वेळ गेल्याने कुटुंबाची खुंटलेली प्रगती लोक न्यायालयातील समेटामुळे पक्षकाराला साधता येते. त्यामुळे लोक न्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत,’ असे अवाहन तालुका विधी सेवा संघाचे अध्यक्ष दिवाणी व फौजदारी न्यायाधीश शैलेश कंठे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाने आणि जिल्हा व सत्र न्यायालय सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत तालुका विधी सेवा समिती व महाबळेश्‍वर वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तेे बोलत होते.

या वेळी वकील संघाचे अध्यक्ष विजयकुमार दस्तुरे, सहाय्यक सरकारी वकील एम. आर.किल्लेदार, अ‍ॅड. राजेश शिंदे, वकील संघाचे सदस्य, पक्षकार उपस्थित होते.

न्या. कंठे म्हणाले, ‘लोक न्यायालयात प्रकरणे मिटल्यास पक्षकारांमध्ये मन:शांती निर्माण होते. तोच वेळ व पैसा चांगल्या कार्यासाठी खर्ची होतो.’

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे गेली 8 ते 9 महिन्यांनी शनिवार, दि. 12 डिसेंबर रोजी महाबळेश्‍वर न्यायालयात लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात नालसा गीताने करण्यात आली. 

या लोक न्यायालयात तडजोडीच्या 27 प्रकरणांपैकी प्रलंबित 17 दिवाणी व फौजदारी प्रकरणे आणि 10 दावापूर्ण प्रकरणे निकालात काढण्यात आली. तडजोडी प्रकरणांचे एकूण रक्कम 7 लाख 79 हजार 174 रुपये वसूल करण्यात आले

लोक न्यायालय यशस्वितेसाठी न्यायालयीन कर्मचारी, वकील संघाचे सदस्य, विधी सेवा समिती यांनी परिश्रम घेतले.