lokadalat

esahas.com

राष्ट्रीय लोकअदालतीला जिल्ह्यात उत्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 9 हजार 117 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली त्यापैकी 1 हजार 412 प्रकरणे निकाली निघाली तसेच वादपूर्व 5 हजार 477 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी तडजोडीने 1 हजार 466 प्रकरणे निकाली निघाली आहेत. 2 मे ते 6 मे 2022 या कालावधीमधील स्पेशल ड्राईव्हमध्ये सातारा जिल्ह्यात एकूण 609 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी दिली

esahas.com

राष्ट्रीय लोकअदालतीला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील पक्षकारांची वाद व वादपूर्व प्रकरणे ही सामंजस्याने व सुसंवादाने तडजोडीने निकाली निघण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 11 हजार 646 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तृप्ती जाधव यांनी दिली.

esahas.com

लोक न्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत

‘लोक न्यायालय ही लोकाभिमुख चळवळ आहे. त्यामुळे आर्थिक आणि वेळेची मोठी बचत होत असून, दोघा पक्षकारांमधील समेटामुळे त्यांच्यात ऋणानुबंध निर्माण होतो. त्याचबरोबर भांडणात वेळ गेल्याने कुटुंबाची खुंटलेली प्रगती लोक न्यायालयातील समेटामुळे पक्षकाराला साधता येते. त्यामुळे लोक न्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत,’ असे अवाहन तालुका विधी सेवा संघाचे अध्यक्ष दिवाणी व फौजदारी न्यायाधीश शैलेश कंठे यांनी केले.