महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळी वेण्णालेक नजीक दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन महिला किरकोळ तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमींवर वाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नीलेश भगवान राजाणे (रा. रुपवली (गोलेकोंड) ता. महाड) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नानासो लक्ष्मण इंगळे (वय 40, रा. देऊळगावसिद्धीकी, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महाबळेश्वर : महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळी वेण्णालेक नजीक दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन महिला किरकोळ तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमींवर वाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नीलेश भगवान राजाणे (रा. रुपवली (गोलेकोंड) ता. महाड) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नानासो लक्ष्मण इंगळे (वय 40, रा. देऊळगावसिद्धीकी, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी 9.30च्या सुमारास महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर महाबळेश्वर पासून अंदाजे तीन किमी अंतरावर वेण्णालेक परिसरातील वैभव ढाबा समोर महाबळेश्वरकडून पाचगणीच्या दिशेने निघालेल्या मारुती एस्टार (एमएच 06 एडब्लू 0181) वाहनास वाईकडून महाबळेश्वरकडे येणार्या शेवरोलेट बीट (एमएच 43 एपी 7171) वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेने आल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन महिला किरकोळ जखमी झाल्या तर मारुती एस्टार वाहनातील रवींद्र सखाराम चौधरी (रा. वडघर, ता. महाड, जि. रायगड) हे गंभीर जखमी झाले. जखमींना वाई येथे उपचारासाठी नेण्यात आले.
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले होते तर मुख्य रस्त्यावरच झालेल्या या अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.