sports

‘स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती’ स्पर्धेत ‘कोविड योद्धा’ लघुपटाला प्रथम पारितोषिक


पाचगणी पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जनजागृती स्पर्धेमध्ये युवासेनेचे महाबळेश्‍वर तालुकाध्यक्ष नितीन भिलारे दिग्दर्शित ‘कोविड योद्धा’ या लघुपटाला प्रथम पारितोषिक मिळाले.  कोरोना महामारीच्या काळात लोकांची सेवा करणार्‍या योद्ध्यांचे मनोबल वाढावे यासाठी

पाचगणी : पाचगणी पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जनजागृती स्पर्धेमध्ये युवासेनेचे महाबळेश्‍वर तालुकाध्यक्ष नितीन भिलारे दिग्दर्शित ‘कोविड योद्धा’ या लघुपटाला प्रथम पारितोषिक मिळाले. 

कोरोना महामारीच्या काळात लोकांची सेवा करणार्‍या योद्ध्यांचे मनोबल वाढावे यासाठी ‘बुम टाऊन एंटरटेनमेंटस्’ या आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून नितीन भिलारे यांनी एक लघुपट चित्रित करण्याचे ठरविले.

महामारीच्या काळात लोकांची अथक परिश्रमाने सेवा करणारे कोविड योद्धे आठवले की, आजही थक्क व्हायला होते. मागील वर्षी आपल्या प्रशासनाने जी सेवा पुरविली ती खरोखरंच प्रशंसनीय अशी आहे. पाचगणी शहराने कोरोना महामारीपासून जनसामान्यांचा बचाव व्हावा, यासाठी जे प्रयत्न केले. ते यामध्ये अधोरेखित करण्यात आले असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय या काळात दिसून येत होता. तो देखील यामध्ये साकारण्यात आला आहे.

‘कोविड योद्धा’ आणि ‘निःशब्द’ या बुम टाऊन एंटरटेनमेंटस् निर्मित लघुपटांचे परिसरातील सर्वच क्षेत्रांमधून कौतुक होत आहे. नितीन भाईंची निर्मिती, संकल्पना आणि दिग्दर्शन उल्लेखनीय आहे. याशिवाय छायाचित्रकार गणेश आंब्राळे यांचे योगदान देखील वाखाणण्याजोगे आहे.


स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जनजागृती स्पर्धेमध्ये मिळालेले हे प्रथम पारितोषिक आमच्यासाठी प्रेरणादायी असून ‘कोविड योद्धा’ या लघुपटाला मिळालेले पारितोषिक हे कोविड योद्ध्यांना आणि ‘निःशब्द’ या लघुपटाला मिळालेलं पारितोषिक हे पर्यावरणाला अर्पण करीत आहोत.
- नितीन भिलारे.