ओमायक्रॅानच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाबळेश्वरमधील सर्व टुरिस्ट पाॅईंट बंद करण्यात आले असून अम्युजमेंट पार्क, वेण्णा लेक बोटिंग पाॅईंट सुद्धा बंद करण्यात आले आहेत. लाॅजिंग मात्र 100 टक्के क्षमतेने सुरू राहणार असून रेस्टाॅरंट 50 टक्के क्षमतेने सुरू असल्याची माहिती महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली आहे.
महाबळेश्वर : ओमायक्रॅानच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाबळेश्वरमधील सर्व टुरिस्ट पाॅईंट बंद करण्यात आले असून अम्युजमेंट पार्क, वेण्णा लेक बोटिंग पाॅईंट सुद्धा बंद करण्यात आले आहेत. लाॅजिंग मात्र 100 टक्के क्षमतेने सुरू राहणार असून रेस्टाॅरंट 50 टक्के क्षमतेने सुरू असल्याची माहिती महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली आहे.
महाबळेश्वरमध्ये पर्यटनासाठी येण्याकरीता पर्यटकांना लशीचे दोन्ही डोस असणे बंधनकारक असणार आहे. तसेच कोव्हिडचे सर्व नियम पर्यटकांना पाळावे लागणार असल्याची माहितीसुद्धा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. गत काही दिवसापासून महाबळेश्वर शहरात पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक हे मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांतून येतात. त्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.
राज्यांत ओमायक्रॅानच्या वाढत्या रूग्णसंख्येवर राज्य शासनाकडून नवीन निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सातारा जिल्हाधिकारी यांनी पर्यटनस्थळांच्या पर्यटन पॅाईटला बंदी आणली आहे. महाबळेश्वर शहरातील पर्यटन पॅाईटच्या बंदीमुळे येथील घोडेस्वारीसह स्थानिकांना आता अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याची भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.