alltouristspotsofmahabaleshwarclosed

esahas.com

महाबळेश्वरचे सर्व टूरिस्ट स्पॉट बंद

ओमायक्रॅानच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाबळेश्वरमधील सर्व टुरिस्ट पाॅईंट बंद करण्यात आले असून अम्युजमेंट पार्क, वेण्णा लेक बोटिंग पाॅईंट सुद्धा बंद करण्यात आले आहेत. लाॅजिंग मात्र 100 टक्के क्षमतेने सुरू राहणार असून रेस्टाॅरंट 50  टक्के क्षमतेने सुरू असल्याची माहिती महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली आहे.