वेण्णा नदीलगत लिंगमळा येथे अनधिकृत बांधकामाचा धडाका
प्रशासनाची हाताची घडी तोंडावर बोट : पर्यावरणप्रेमींकडून संताप
महाबळेश्वरमधील वेण्णालेक नदीपात्रातील परिसरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोन धनिकांविरुद्ध नगरपालिकेने गुन्हा दाखल केला गेला असून देखील याच परिसरातील लिंगमळा येथील सर्व्हे नंबर 35 मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम नदी पात्राला लागून करण्यात आले असून, नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. एकाला एक न्याय आणि दुसर्याला वेगळा न्याय, असा अन्याय का? असा सवाल देखील कारवाई झालेल्या बांधकाम धारक
कुडाळ : महाबळेश्वरमधील वेण्णालेक नदीपात्रातील परिसरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोन धनिकांविरुद्ध नगरपालिकेने गुन्हा दाखल केला गेला असून देखील याच परिसरातील लिंगमळा येथील सर्व्हे नंबर 35 मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम नदी पात्राला लागून करण्यात आले असून, नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. एकाला एक न्याय आणि दुसर्याला वेगळा न्याय, असा अन्याय का? असा सवाल देखील कारवाई झालेल्या बांधकाम धारकांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सर्व्हे नंबर 35 ला बाहेरच्या बाजूने पत्र्याचे मोठे कंपाउंड करण्यात आले व तद्नंतर अंतर्गत बांधकाम सुरू करण्यात येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार पालिकेत तक्रार देऊन ही या बांधकामावर नगरपालिकेने गांधारीची भूमिका घेतलेली दिसून येत आहे. वेण्णालेक ते लिंगमळा परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. या मधील नदी पात्रात बांधकाम केलेल्या फक्त दोनच जणांवर पालिकेने कारवाई केली. सर्व्हे नंबर 35 वर कारवाई का केली गेली नाही, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
लिंगमळा परिसरात धनदांडग्यांकडून गोरगरिबाच्या जागा भाडे तत्त्वावर घ्यायच्या व गरीब जागामालकाकडून वीस ते पंचवीस वर्षाचा करार करून घ्यायचा त्याबदली जागा मालकाला चिरीमिरी देऊन धनदांडग्याकडून अनधिकृत ईमले बांधायचे व वीस पंचवीस वर्ष झाले की धनदांडगा जागेवर कब्जा करून बसणार यांत गरिबाची फसवणूक होणार, अशा फसवणुकीचे धंदे मोठ्या प्रमाणात लिंगमळा परिसरात होत आहेत.
अनधिकृत बांधकामावर जिल्हाधिकार्यांनीच आता फूटपट्टी लावावी
महाबळेश्वरातील सगळ्यात मोठी असणारी वेण्णा नदी याचे उगम महाबळेश्वरातून होते व ते थेट कन्हेर धरणापर्यंत जाऊन पोहोचते. महाबळेश्वरातून उगम होणार्या नदीच्या दोन्ही बाजूने महाबळेश्वरमध्ये धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली आहेत. काहींनी प्रशासनाला मॅनेज केले आहे तर काहींनी असेच मनगटाच्या ताकदीवर उभारले आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणीही कारवाई करायला तयार नाही, याची तक्रार होते त्यावरच फौजदारी गुन्हा दाखल होतो. मात्र, इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई का होत नाही, असा सवाल देखील पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे नदीपात्राच्या दोन्ही बाजूने अनधिकृत बांधकामावर थेट जिल्हाधिकार्यांनी आता फूटपट्टी लावावी, अशी मागणी देखील होऊ लागली आहे.