maharashtra

महाबळेश्वर जवळील मुकदेव घाटात 40 मजुरांचा टेम्पो पलटी


महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीक घाटातील तीव्र उतारावर मजुरांना घेवून जाणाऱ्या टेम्पोला अपघात झाला आहे. या घटनेत 40 मजूर टेम्पोतून प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीक घाटातील तीव्र उतारावर मजुरांना घेवून जाणाऱ्या टेम्पोला अपघात झाला आहे. या घटनेत 40 मजूर टेम्पोतून प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टेम्पोतील मजूर बुलढाणा व अकोला भागातील आहेत. अपघातातील जखमींच्या बचाव कार्यासाठी सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांनी मदत केली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वरहून तापोळा मार्गावर हा अपघात झाला आहे. दिनांक 14 जानेवारी रोजी दरे तांब, तालूका महाबळेश्वर या ठिकाणी काम करण्यासाठी पुणे,चाकण येथून 40 प्रवासी प्रवास करत होते. रस्त्याच्या कामासाठी एकूण 40 प्रवासी होते. सकाळी 7:00 वाजता प्रवास चालू होता. प्रवासादरम्यान बुरडाणी घाटामध्ये गाडीचे ड्रायव्हर प्रदीप खंडू कुरदने वय 23 हे गाडी चालवत होते. सकाळी 8 वाजता गाडीचा ब्रेकफेल झाल्यामुळे ड्रायव्हरने प्रसंगावधान साधून गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी 300 फूट खोल दरीत कोसळली. याच घाटामधून तळदेव येथील स्थानिक लोक प्रवास करत असताना त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे माहिती दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव व तापोळा यांच्या तीन रुग्णवाहिका व स्टाफ घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच स्थानिक लोकांच्या खाजगी वाहनातून जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे घेऊन आले. यामध्ये लहान मुले 11, महिला 10, पुरुष 8
या लोकांची प्रकृती स्थिर असल्याकारणाने या लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे ठेवण्यात आलेले आहे. तसेच ज्या जखमीची प्रकृती अति जखमेची आहे अशा लोकांना प्राथमिक उपचार देऊन ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे दाखल करण्यात आलेले आहे. यामध्ये एकूण 11 लोकांना रेफर करण्यात आले. यामध्ये गर्भवती माता 2 आहेत. दोन लहान मुले व एक महिला व एक पुरुष यांना सातारा सिव्हील हाॅस्पीटल ला पाठवले आहे.