sports

पाचगणीत जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती; हजारो लिटर पाणी वाया


पर्यटननगरी पाचगणी (ता. महाबळेश्‍वर) येथील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीतून अनेक ठिकाणी गळती सुरू असून हजारो लिटर पाणी रस्त्यालगतच्या गटारातून वाहून जात आहे. नागरिकांच्या दृष्टीने पाणी महत्त्वाचे असलेतरी जीवन प्राधिकरणाच्या बेजबाबदार मस्तवाल अधिकार्‍याला पाण्याचे महत्त्व नाही. अधिकार्‍याच्या हलगर्जीपणामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याच्या समस्येमुळे पाचगणीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

पाचगणी : पर्यटननगरी पाचगणी (ता. महाबळेश्‍वर) येथील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीतून अनेक ठिकाणी गळती सुरू असून हजारो लिटर पाणी रस्त्यालगतच्या गटारातून वाहून जात आहे. नागरिकांच्या दृष्टीने पाणी महत्त्वाचे असलेतरी जीवन प्राधिकरणाच्या बेजबाबदार मस्तवाल अधिकार्‍याला पाण्याचे महत्त्व नाही. अधिकार्‍याच्या हलगर्जीपणामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याच्या समस्येमुळे पाचगणीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

महावितरण कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाकडे जाणारी प्राधिकरणाची जलवाहिनी गेली वीस दिवसांपासून फुटली आहे. हजारो लिटर पाणी वाया जात असतानाही जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांचे याकडे सपशेल दुर्लक्ष आहे. असे सुरू असताना पाचगणीकरांच्या या प्रश्‍नाचा आपला काहीही संबंध नसल्यासारखे प्राधिकरणाचे अधिकारी निवांत  आहेत. अधिकार्‍याच्या नियोजनशून्य व बेजबाबदारपणाचा फटका पाचगणीकरांना बसत असून, प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे पाचगणीत पाण्याचा अपव्यय होत आहे. प्राधिकरणाने या गळतीवर तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे. 

पाण्याचे मीटर न पाहताच ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले, धनदांडग्यांवर कृपादृष्टी, वर्षांनुवर्षे बंद असलेल्या घराला भरमसाठ बील यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या पाचगणी जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्य व भोंगळ कारभाराला पाचगणीकर वैतागले असून, प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे पाचगणीकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

अनेक ठिकाणी सुरू असलेल्या गळतीचे प्रमाण प्रचंड असून, हजारो लिटर पाणी वाया जात आहे. संबधित अधिकार्‍याला कल्पना देऊनही अधिकारी डोळेझाक करत आहेत. गेंड्याची कातडीही कमी पडेल अशी अवस्था पाचगणी जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यात मुरली आहे. अधिकार्‍याचा हा बेजबाबदारपणा प्रशासनाला व शासनाला कधी कळणार, याकडे पाचगणीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.