maharashtra

महाबळेश्वर येथील घरफोडीचा गुन्हा उघड

पिकअपसह 5 लाख 66 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाबळेश्वर येथे दिनांक 10 जानेवारी रोजी घरफोडीचा गुन्हा घडला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने वेगवान तपास करून तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 5 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सातारा : महाबळेश्वर येथे दिनांक 10 जानेवारी रोजी घरफोडीचा गुन्हा घडला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने वेगवान तपास करून तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 5 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रवीण चंद्रकांत घाडगे राहणार एरंडोल तालुका महाबळेश्वर सध्या राहणार संगम नगर सातारा, अनिकेत वसंत पाटणकर चंदन नगर कोडोली, आकाश ज्ञानेश्वर कापले दत्तनगर कोडोली या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणाची माहिती अशी, चोरट्यांनी दोन लाख 29 हजार रुपये किमतीचे पॉलीकॅब वायर कटर मशीन, ड्रिल मशीन, ॲल्युमिनियम व प्लंबिंग साहित्य चोरून नेले होते. त्यानुसार महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शना अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तपास गतिमान केला. देवकर यांना 19 जानेवारी रोजी बातमीदारामार्फत संबंधित आरोपी देगाव फाटा येथे आले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने देगाव फाटा येथे जाऊन दोन इसमांना पिकअप व्हॅन सह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पॉलीकॅब वायर कटर मशीन, ड्रिल मशीन, ॲल्युमिनियम व प्लंबिंग साहित्य इत्यादी साहित्य ताब्यात घेण्यात आले. चोरी केलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा मिळून 5 लाख 66 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप भागवत करत आहेत.
या कारवाईमध्ये संतोष पवार, रविंद्र मोरे, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, उत्तम दबडे, तानाजी माने, आदेश घाडगे, संजय शेडगे, विजय कांबळे, विश्वनाथ सपकाळ, अजित कर्णे, प्रवीण कांबळे, शिवाजी भिसे, स्वप्निल माने, अमोल माने, प्रवीण पवार, केतन शिंदे यांनी सहभाग घेतला.