sports

धार्मिकस्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भिलारमध्ये ‘भाजप’तर्फे घंटानाद आंदोलन


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बंद असणारी सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे गेली कित्येक दिवसांपासून उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तरी देखील राज्य सरकारकडून दखल घेतली गेली नसल्याने आज शनिवारी (दि. 29) राज्य शासनाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाबळेश्‍वर तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. 

पाचगणी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बंद असणारी सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे गेली कित्येक दिवसांपासून उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तरी देखील राज्य सरकारकडून दखल घेतली गेली नसल्याने आज शनिवारी (दि. 29) राज्य शासनाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाबळेश्‍वर तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. 
महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या सूचनेनुसार ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, खा. उदयनराजे भोसले, माजी आ. मदनदादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्‍वर तालुक्याच्यावतीने मंदिर खुले करून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भजन, घंटा वाजवून, निषेध फलक व घोषणा देऊन सरकारचा निषेध केला.
यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘दार उघड उद्धवा दार उघड, पुरे झाले पुरे झाले मंदिरांची दारे खुली करा,’ या सारख्या घोषणा देत राज्य सरकारचा जोरदार घंटानाद करत निषेध नोंदवला. 
या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे, चेतन पार्टे, शेखर भिलारे, प्रकाश भिलारे, सन्नी मोरे, दीपक बावळेकर, तानाजी दाभाडे, आनंदा बिरामणे, मंगेश उपाध्याय, जगन्नाथ भिलारे, अजित सपकाळ, शंकर आब्राळे, बाळासाहेब आब्राळे, सुनील जाधव, भिकूदादा शिंदे, मारुती भिलारे, राजू आबा भिलारे, जयवंत बिरामणे, संतोष मोरे, नयन मोरे, रोहन कदम, अंकिता मोरे आदी सहभागी झाले होते.