वाई-पाचगणी दरम्यान असणाऱ्या पसरणी घाटात कारमधून प्रवास करणाऱ्या जावली तालुक्यातील बहीण-भावंडांना दुचाकी आडवी मारून त्यांच्याकडून भर रस्त्यात गळ्यातील चैन, रोख रक्कम असा दोन लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 आणि कचरामुक्त शहरे सर्वेक्षणमध्ये जिल्ह्यातील कराड आणि पाचगणी या शहरांनी बाजी मारली आहे. या शहरांना स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत देशपातळीवर पुरस्कार जाहीर झाला.
स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींच्या पाचगणी येथील वास्तव्याच्या स्मृती हा पाचगणीकरच नव्हे, तर महाराष्ट्रवासीयांसाठी एक अभिमानाचा क्षण नी आठवणींचा ठेवा. या सुखद स्मृतींचा सुगंध जतन करण्याच्या हेतूने पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी टाकाऊ बांधकाम साहित्य वापरून गांधीजींच्या 8 फूट उंच प्रतिमेची निर्मिती करण्याच्या संकल्प केला. त्यामुळे इमारत बांधकामातील भंगार, टाकाऊ सामान, राडारोडा यांचा पुनर्वापर करून गांधीजींचे आणि स्वच्छतेचे असलेले सर्वश्रूत नाते अधोरेखित केले आहे.
‘महाबळेश्वर तालुका हा अतिदुर्गम असल्याने सर्व तालुक्यातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला कोरोना लस मिळायला हवी, याची खबरदारी आरोग्य विभागाने घ्यावी व प्रत्येक ज्येष्ठांनी ही लस घेण्यासाठी आग्रही राहावे,’ असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी केले.
महाबळेश्वर तालुक्यातील आंब्रळ ग्रामपंचायत परिसरात राजपुरी व आंब्रळच्या सरहद्दीवर असणार्या एका धनिकाने आपल्या बंगल्याच्या सुरक्षा भिंतीजवळचा रस्ता जेसीबीने खोदून रहदारीसाठी बंद केला. तब्बल वीस फुटांपेक्षा अधिक रस्ता खोदण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असणारी सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे गेली कित्येक दिवसांपासून उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तरी देखील राज्य सरकारकडून दखल घेतली गेली नसल्याने आज शनिवारी (दि. 29) राज्य शासनाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाबळेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली.