वन विभागाचे वेण्णालेक जवळ असलेल्या प्रतापसिंह उद्यानाचा कायापालट करण्यासाठी त्याच्या नुतनीकरणाचे काम वन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले असुन या नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत खुरासणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला. यावेळी वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी हे देखिल उपस्थित होते.
महाबळेश्वर : वन विभागाचे वेण्णालेक जवळ असलेल्या प्रतापसिंह उद्यानाचा कायापालट करण्यासाठी त्याच्या नुतनीकरणाचे काम वन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले असुन या नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत खुरासणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला. यावेळी वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी हे देखिल उपस्थित होते. पत्रकार दिनाचे औचित्य साधुन वन विभागाच्या वतीने या भुमिपुजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वेण्णालेक प्रमाणेच प्रतापसिंह उद्यान हे पयर्टकांचे मुख्य आकषर्ण होते अनेक हिंदी मराठी चित्रपटांचे चित्रिकरण या बागेत करण्यात आले आहे. वेण्णालेकच्या पार्श्वभुमी लाभलेले हे उद्यान कायम पयर्टकांनी गजबजलेले असायचे. लहान मुलांसाठी येथे अनेक खेळणी होती. तसेच जाणकारांसाठी येथे वस्तु संग्राहलय होते. सुदर बगीचा, मोठे प्रशस्त रस्ते, घनदाट जंगल अशा सुंदर उद्यानाकडे मध्यंतरी वन विभागचे दुर्लक्ष झाले, आणि हे उद्यान आपले सौदर्य हरवुन बसले. त्यामुळे या उद्यानाकडे पयर्टकांनी पाठ फिरविली. या उद्यानातील पयर्टकांची संख्या रोडावली. आता वनक्षेत्रपाल पदावर काही दिवसांपुर्वी श्रीकांत कुलकर्णी यांची नेमणुक झाली आहे. त्यांनी आता या उद्यानाला लवकरच उर्जितावस्था आणण्यासाठी पाउले उचलली आहेत. पहिल्या टप्प्यात या उद्यानाचा कायापालट करण्यात येणार आहे. याठिकाणी जी जुनी लहान मुलांची खेळणी आहेत, ती बदलुन त्या ठिकाणी टाकावूतुन टिकाऊ या संकल्पनेप्रमाणे वापराविना पडुन असलेल्या जुन्या टायरपासुन खेळणी तयार करण्यात येणार आहेत. या टायरची आकर्षक सजावट देखिल येथे करण्यात येणार आहे. हे काम जानेवारी अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने पुढील सुधारणा व सुशोभिकरणाचे काम पुर्ण केले जाणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. पत्रकार दिनाचे औचित्य साधुन प्रतापसिंह उद्यानातील कामाच्या भुमीपुजनाचा मान या वेळी हिलदारीचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी श्रीफळ वाढविला. या वेळी पत्रकार विलास काळे, अजित जाधव, सचिन शिर्के, प्रेषित गांधी व अभय हवालदार त्याचप्रमाणे वनपाल सहदेव भिसे व वनरक्षक लहु राउत हे देखिल उपस्थित होते.
भुमिपुजनाच्या कार्यक्रमा नंतर येथील हिरडा विश्रामगृहावर पत्रकार दिनानिमित्त शहरातील सर्व पत्रकारांचा वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी वन विभागाच्या वन संरक्षण व संवधर्नाच्या सर्व उपक्रमांना पत्रकार सहकार्य करतील, असे आश्वासन पत्रकार विलास काळे यांनी यावेळी बोलताना दिले.


