pratapsinghudyanatvennalakewillbetransformed

esahas.com

वेण्णा लेक येथील प्रताप सिंह उद्यानाचा होणार कायापालट

वन विभागाचे वेण्णालेक जवळ असलेल्या प्रतापसिंह उद्यानाचा कायापालट करण्यासाठी त्याच्या नुतनीकरणाचे काम वन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले असुन या नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत खुरासणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला. यावेळी वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी हे देखिल उपस्थित होते.