maharashtra

ठाणे येथील महिलेचा महाबळेश्वरमध्ये मृत्यू


Woman from Thane dies in Mahabaleshwar
महाबळेश्वरमध्ये पर्यटनास आलेल्या पर्यटक महिलेचा गुरुवारी अकस्मात मृत्यू  झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर आज सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. याबाबतची फिर्याद हॉटेल व्यावसायिक शिवराज सणस यांनी दिली. सुचित्रा अविनाश गोगर (वय ४५, रा. ठाकुर्ली, ठाणे) असे मृत महिलेचे नाव आहे.

सातारा : महाबळेश्वरमध्ये पर्यटनास आलेल्या पर्यटक महिलेचा गुरुवारी अकस्मात मृत्यू  झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर आज सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. याबाबतची फिर्याद हॉटेल व्यावसायिक शिवराज सणस यांनी दिली. सुचित्रा अविनाश गोगर (वय ४५, रा. ठाकुर्ली, ठाणे) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, काल (ता. २६) सकाळी वेण्णालेकनजीक ग्रीनपार्क कॉटेज या हॉटेलमध्ये गणेश पेडणेकर (रा. चेंबूर, मुंबई), सुचित्रा गोगर व त्यांची मुलगी वैदेही हे दोन रूममध्ये गेले. काही वेळानंतर पेडणेकर यांनी सुचित्रा यांचा पाय दुखत असल्याने डॉक्टरबाबत हॉटेल व्यवस्थापकाकडे विचारणा केली. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारही केले.
दरम्यान, रूममध्ये सुचित्रा व वैदेही या दोघीच होत्या. दहाच मिनिटांत रूममधून किंचाळण्याचा आवाज आल्याने हॉटेल व्यवस्थापक रूमबाहेर आले. वैदेहीने रूमचा दरवाजा उघडला. त्यावेळी सुचित्रा या रूममधील बाथरूमच्या फरशीवर पडल्या होत्या. त्या चक्कर येऊन पडल्याचे वैदहीने सांगितले. तातडीने सुचित्रा यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक संदीप भागवत, पोलिस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नवनाथ शिंदे, सलीम सय्यद तपास करत आहेत.