पाचगणीत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी
‘टेबललँड व्यापारी असोसिएशन’ची मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
कोरोनाचे संकट कोसळल्याने शासनाने 20 मार्चपासून पूर्णतः लॉकडाऊन करून पर्यटकांना बंदी घालण्यात आली. गेली सहा महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने पर्यटन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाचगणी शहरातील बहुतांशी लोकांचे जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून असल्याने पॉइंटवरील व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी टेबललँड व्यापारी असोसिएशनच्यावतीने पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
पाचगणी : कोरोनाचे संकट कोसळल्याने शासनाने 20 मार्चपासून पूर्णतः लॉकडाऊन करून पर्यटकांना बंदी घालण्यात आली. गेली सहा महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने पर्यटन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाचगणी शहरातील बहुतांशी लोकांचे जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून असल्याने पॉइंटवरील व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी टेबललँड व्यापारी असोसिएशनच्यावतीने पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनातील अधिक माहिती अशी की, लॉकडाऊनला सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु आजतागायत जनजीवन सुरळीत होऊ शकलेले नाही.पठारावरील घोडे, घोडागाडी, स्टॉलधारक, आइसक्रीमवाले असे सुमारे 700 व्यावसायिकांच्या उपजीविकेचे प्रश्न उपस्थित झाला आहे. घोडेवाल्यांना मोठा फटका बसला आहे. घोड्यांना लागणारे खाद्य सुद्धा उपलब्ध करायचे आहे. त्यामुळे घोडेवाल्यांची परिस्थिती बिकट होऊन बसली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमधील कार्यकाळात घोडे एकाच जागेवर तबेल्यात बांधले जात असल्याने आजारी पडत आहेत. त्यामुळे आतापर्यंत सुमारे 25 घोड्यांचा मृत्यू झाला असून
इथल्या सर्वसामान्य लोकांच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातून इथे पर्यटन सुरू व्हावे, व्यावसायिकांच्या हिताच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही शेवटी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकारने ई-पास रद्द केला आहे व हॉटेल्स व लॉजेसना सुरू करण्यास परवानगी दिली असल्याने, पाचगणीचे पर्यटन योग्य ती काळजी घेत सुरू झाले पाहिजे. विविध नियम, संकेत पाळणे सोपे जाईल व या नवीन पद्धतीने वागण्याचा सराव होईल. ज्या गोष्टींची काळजी घ्यायचीय, त्यांची सवय होईल. घोडे, घोडागाडी, स्टॉल्स आदी व्यवसाय सुरू होतील. सर्वांचे उत्पन्न सुरू होण्याची आवश्यकता आहे.
- राहुल बगाडे, घोडा व्यावसायिक, टेबललँड.