महाबळेश्वर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, पाचगणी शहरानजीक असलेल्या गोडवली गावात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी रात्री गोडवलीतील 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. पाचगणी शहरातही आणखी 3 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 494 झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, पाचगणी शहरानजीक असलेल्या गोडवली गावात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी रात्री गोडवलीतील 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. पाचगणी शहरातही आणखी 3 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 494 झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोडवली व पाचगणी शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. पाचगणी शहरात अडीच महिन्यांपूर्वी चोर पावलाने शिरकाव केलेल्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही पाय पसरायला सुरुवात केल्याने आता ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात हळूहळू कोरोनाचा विळखा घट होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील बहुतेक भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 11 जुलै रोजी गोडवलीतील 52 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सदर व्यक्तीच्या घरातील सदस्यांचे रिपोर्ट तपासणीला पाठवण्यात आले होते. त्यात माय लेकरांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एक-एक करत गावातील कोरोनाबाधितांची संख्या 40 झाली होती. यात 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. दीड महिन्याच्या परिश्रमानंतर गाव कोरोनामुक्तीच्या अंतिम टप्प्यात आले असताना 53 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आणि त्यानंतर गावात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले.
एकीकडे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा वाढत असताना यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसल्यानंतर आणि बाहेरून आल्यानंतर याची माहिती आरोग्य विभागाला देण्यास नागरिक कुचराई करीत आहेत. परिणामी, मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.